Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेरच्या दिवशी अनेकांची बंडखोरी

मातब्बर नेत्यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज ; 4 नोव्हेंबरला होणार राजकीय चित्र स्पष्ट

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी महायुतीसह महाविकास आघाडीसह विविध पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर अनेक

नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार
जल जीवन मिशन’ जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन
बहिणींच्या राखीने बंदिवान भाऊ गहिवरले

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी महायुतीसह महाविकास आघाडीसह विविध पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर अनेक ठिकाणी बंडखोरी होत उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. श्रीगोंद्यात शरद पवार गटाचे राहुल जगताप यांनी तर अहिल्यानगर शहरातून ठाकरे गटाचे भगवान फुलसौंदर यांनी तर दुसरीकडे भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांनी देखील बंडखोरी केली आहे.
उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार गटाचे नवाब मलिक, बाळासाहेब थोरात, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी बंडाचा झेंडा हातात घेत एक अपक्ष आणि दुसरा पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करत असतांनाच शेवटच्या क्षणी त्यांना एबी फॉर्म दिल्यामुळे नवावब मलिक अजित पवार गटाकडून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी मला पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला तर पक्षाकडून आणि नाही मिळाला तर अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तसेच दुपारी 3 वाजेपर्यंत मला एबी फॉर्म मिळण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना अखेरच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला असून आता पक्षाचे अधिकृत उमेदवारी म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासोबतच भाजप नेत्या आणि माजी आमदार तृप्ती सावंत यांनी पक्ष सोडून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. यानंतर त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने येथून वरुण सरदेसाई यांना तिकीट दिले आहे.

अहिल्यानगर शहर मतदारसंघात फुलसौंदर यांची बंडखोरी
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संंग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने अभिषेक कळमकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र कळमकर यांच्या उमेदवारी ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने बंडखोरी करत माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी जिल्हाप्रमुख व इतर पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्यामुळे फुलसौंदर यांचे बंड थोपवण्यात ठाकरे गट यशस्वी होतो की नाही, ते 4 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.


भाजप नेत गोपाळ शेट्टी यांची बंडखोरी
बोरिवली विधानसभा मतदार संघातून भाजप नेते गोपाळ शेट्टी हे नाराज असून त्यांनीही आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर आता शेट्टी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

COMMENTS