Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हयात

मनपा द्वारे नगर शहराचा पाणीपुरवठा राम भरोसे सुरू असल्याची कबुली.
ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स : राहुल गांधी यांचा सवाल
सूरत-हैदराबाद महामार्गबाधितांनाजास्तीत जास्त मोबदला मिळावा : मंत्री थोरात करणार पाठपुरावा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हयात सर्वाधिक 232 शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ 1 शॅडो मतदान केंद्र असणार आहे.
राज्यात एकूण 24 जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र असतील. 12 जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र नसतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. यामध्ये विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्हीएचएफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय बीएसएनएलमार्फत पर्यायी कम्युनिकेशन यंत्रणाही कार्यरत असेल. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात 22, अमरावती 73, छत्रपती संभाजीनगरमध्ये 9, बीड 22, भंडारा 02, बुलढाणा 07, चंद्रपूर 41, धुळे 16, गडचिरोली 49, गोंदिया 33, जळगाव 16, कोल्हापूर 17, नागपूर 04, नांदेड12, नंदूरबार 69, नाशिक 102, पुणे 38, रायगड 46, रत्नागिरी 232, सांगली01, सातारा31, सिंधुदुर्ग 60, वर्धा 02, यवतमाळ 11 अशी एकूण 915 शॅडो मतदानकेंद्र असणाअसणार आहेत.

COMMENTS