Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागा वाटपांवरुन खा. राहुल गांधी नाराज

नवी दिल्ली : महाविकास आघाडीचा 90-90-90 असा जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरला असल्याचा दावा केला जात असला तरी आघाडीमध्ये अजूनही सर्वकाही आलबेल नसल्याच

वाजेगाव निंबळकमध्ये अवैध गुटखा जप्त
आलिया भट्टच्या वडिलांवर हृदयशस्त्रक्रिया
आर टी ई प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थी पालक याना भेटून समतादूत यांच्याकडून ऍडमिट कार्डचे वाटप व मार्गदर्शन
बीजेपी जो करती है उसका हिंदू धर्म से कोई मतलब नहीं, पेरिस से राहुल गांधी ने  केंद्र पर साधा निशाना - rahul gandhi bjp Nothing Hindu about what the BJP  does ntc -

नवी दिल्ली : महाविकास आघाडीचा 90-90-90 असा जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरला असल्याचा दावा केला जात असला तरी आघाडीमध्ये अजूनही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. कारण जागा वाटपांवरून काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडलेल्या जागेवरुन नाराज आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. कॉग्रेस नेत्यांनी वाटाघाटी करताना योग्य भूमिका पार पाडली नसल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी फक्त हे मत व्यक्त केले नाही. तर ते काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीतून अर्ध्यातून बाहेर पडले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई आणि विदर्भातील जागा शिवसेना ’उबाठा’ला सोडल्यामुळे राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याला जागा वाटप करण्यासाठी पाठविले होते. त्यात विदर्भ आणि मुंबईतील काही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला सोडल्याबद्दल राहुल गांधी यांनी नाराजी सर्वांसमोर व्यक्त केली आहे. दरम्यान, मेरिटच्या आधारावर काँग्रेसला जादा जागा मिळायला पाहीजे. विदर्भ पश्‍चिम महाराष्ट्र मराठवाड्यात जागा मिळायल्या पाहीजे होत्या. आम्ही त्या पक्षांना सांगितलं आहे. राहुल गांधी यांनाही आम्ही या विषयावर स्पष्टीकरण दिले असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

COMMENTS