Homeताज्या बातम्यादेश

गोव्यातील चित्रपट महोत्सवाची लगबग सुरू

पणजी : नोव्हेंबर महिना उत्सवाची भावना घेऊन येत असल्यामुळे आम्ही तुम्हाला चित्रपटांच्या वार्षिक महोत्सवाचा-भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इ

पिकविम्याची रक्कम शेतकर्‍यांना त्वरित मिळावी ः विवेक कोल्हे
युवराज गणेश मित्र मंडळाची कार्यकारणी जाहीर
महाविकास आघाडी सरकार हे ‘पुलोद’ची पुनरावृत्ती – खा.राऊत

पणजी : नोव्हेंबर महिना उत्सवाची भावना घेऊन येत असल्यामुळे आम्ही तुम्हाला चित्रपटांच्या वार्षिक महोत्सवाचा-भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) भाग बनण्यासाठी आमंत्रित करतो, जो पणजी, गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणार आहे. गोवा राज्यातील अरबी समुद्राच्या नेत्रदीपक पार्श्‍वभूमीवर सिनेमाचा आनंद साजरा करण्यासाठी जगभरातील चित्रपट प्रेमी येथे एकत्र येतात.
तुम्ही जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपर्‍यातील आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्‍वभूमीतले असाल, मात्र इफ्फी तुम्हाला चित्रपटांबद्दलच्या प्रेमासाठी एकत्र येण्याची संधी देते. हे बंध साजरे करण्यासाठी, आम्ही सर्वांना कथाकथनाचा आनंद आणि मोठ्या स्क्रीनची जादू अनुभवण्यासाठी आमंत्रित करत आहोत. तुम्ही नोंदणी करू शकता आणि या वर्षीच्या महोत्सवासाठी इफ्फी प्रतिनिधी बनू शकता.55 व्या इफ्फी मध्ये, तुम्हाला 16 क्युरेटेड सेगमेंटमध्ये जगभरातील चित्रपटांची वैविध्यपूर्ण श्रेणी पहायला मिळेल. तुम्हाला हृदयस्पर्शी नाट्य , थरारक माहितीपट किंवा नाविन्यपूर्ण लघुपट आवडत असतील तर या महोत्सवात प्रत्येक चित्रपट रसिकांना आनंद देणारे काही ना काही आहे. प्रतिनिधींना इतर कोणाच्याही आधी अनेक चित्रपट पाहण्याची खास संधी असणार आहे कारण अनेक चित्रपटांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रीमियर येथेच इफ्फीमध्ये होणार आहेत. मात्र केवळ चित्रपट पाहण्यापुरते हे मर्यादित नाही ; तर कथा सांगण्याची कला देखील इथे शिकता येईल ! इफ्फीमध्ये दिग्गज चित्रपट निर्माते आणि उद्योग व्यावसायिकांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा आणि मास्टर क्लासेस सादर केले जातात , जे त्यांचे विचार आणि अनुभव सामायिक करण्यास उत्सुक असतात. प्रत्यक्ष चर्चेत सहभागी व्हा , तुमच्या कल्पना मांडा आणि सीमांच्या पलीकडे जाऊन मैत्री करा आणि जर तुम्ही उत्कट आणि नवोदित चित्रपट निर्माते असाल तर तुमचा पुढचा मोठा प्रकल्प साकार होऊ शकेल. तुम्हाला चित्रपट उद्योगातील भपका आणि प्रसिद्धी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देखील मिळेल.इफ्फी रेड कार्पेटमध्ये प्रख्यात चित्रपट निर्माते, अभिनेते आणि मान्यवरांचा समावेश आहे जे त्यांचे काम सर्वांसमोर आणण्यासाठी आणि सिनेमाबद्दलचे त्यांचे प्रेम सामायिक करण्यासाठी एकत्र जमतात. इफ्फी प्रतिनिधींना चित्रपट निर्माते, अभिनेते आणि या उद्योगातील तज्ञांना भेटायची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देखील मिळेल. कल्पना करा, तुमच्या आवडत्या चित्रपटांना पडद्यावर साकार करणार्‍या लोकांसोबत प्रत्यक्ष चर्चा आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त, इफ्फी पुन्हा एकदा ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’, ‘फिल्म बझार’ आणि ‘सिने मेला’ 2024 ची आवृत्ती घेऊन येत आहे जे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला नवोदित प्रतिभावंतांसाठी आणि एकूणच चित्रपटांशी संबंधितांसाठी ‘वन स्टॉप शॉप’ बनवते. चला तर, आयुष्यभराच्या अनुभूतीसाठी सज्ज व्हा. या अनोख्या सिनेसृष्टीच्या प्रवासाचा भाग बनण्याची तुमची संधी हुकवू नका.

COMMENTS