Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच कोटींच्या घबाडावरून विरोधक आक्रमक

मुंबई :राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांकडून गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तपासणी होतांना दिसून येत आहे. त्यातच खेड-शि

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा शारदा ज्ञानोत्सव आहे-रणवीर पंडित
महापारेषणकडून आशादीप विशेष मुलांच्या शाळेस मदत
इंद्रायणी नदीत रसायन युक्त पाणी सोडणार्‍या 6 कंपन्यांवर कारवाई

मुंबई :राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांकडून गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तपासणी होतांना दिसून येत आहे. त्यातच खेड-शिवापूर टोलनाक्यावर काल रात्री एका वाहनातून 5 कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधार्‍यांविरोधांत टीका केली आहे.
खेड शिवापूर टोलनाका परिसरात पुणे ग्रामीण पोलिसांनी चेक पोस्ट दरम्यान विविध वाहनांची तपासणी सोमवारी सुरू केली होती. यावेळी रात्री एमएच 45 एएस 2526 या क्रमांकाची एक इनोवा क्रिस्टा पांढर्‍या रंगाची गाडी सदर ठिकाणी आली. सदर गाडीतील वाहन चालकाकडे कागदपत्रांची मागणी करून गाडी तपासणी केली असता, गाडीत मोठ्या प्रमाणात पैसे मिळून आले. मात्र याप्रकरणी पोलिस अधिकारी, प्रांतधिकारी, निवडणूक अधिकारी यांनी बर्‍याच वेळापासून कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र या रोकड पैशांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी सदर वाहन खेड शिवापूर पोलिस ठाण्यात नेले. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, खेड शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांना एक संशयित इनोव्हा कार पोलिसांना मिळून आली आहे. सदर गाडीमध्ये पोलिसांना पैसे मिळाले असून त्याबाबतची मोजणी करण्यात येत आहे. सांगोला येथील नलावडे नावाच्या व्यक्तीवर संबंधित गाडी असल्याचे दिसून आले आहे. याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे. पोलिसांना ज्या गाडीत 5 कोटी रुपयांची रक्कम सापडली, ती गाडी सांगोल्यातील अमोल नलावडे याच्या नावावर असल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मंगळवारी पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलिस म्हणाले की, पंचनामा केल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की, तब्बल पाच कोटींची कॅश जप्त करून ती रक्कम इनकम टॅक्स विभागाला पुढच्या चौकशीसाठी देण्यात आलेली आहे. चौकशी केली असता जप्त करण्यात आलेल्या रक्कमेतील सर्व नोटा खर्‍या आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा खर्‍या असून एकूण पाच कोटींची रक्कम आहे. पकडण्यात आलेली गाडी कोणाची आहे? याबाबतचा तपास सुरु आहे. सदरची गाडी ही मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. या प्रकणात राजकीय काही कनेक्शन आहे का? याबाबत आम्ही चौकशी करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

सत्ताधारी आमदारांना 15 कोटींचा हप्ता पोहोचला :राऊतांचा आरोप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडून सत्ताधारी आमदारांना निवडणुकीसाठी प्रत्येकी 50 कोटींची आर्थिक रसद पोहोचवण्यात येत असल्याचा आरोप केला. पुण्याच्या खेड शिवापूर परिसरात एका गद्दार आमदाराच्या गाडीतून 15 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते, पण त्यापैकी 5 कोटीच रुपये दाखवण्यात आले, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

माझा त्या पाच कोटींशी काहीही संबंध नाही :शहाजीबापू पाटील
खेड शिवापूर या भागात पकडण्यात आलेल्या पाच कोटी रोकड रकमेशी शहाजीबापू पाटील यांच्याशी संबंध लावला जात आहे. महाराष्ट्रभर याची चर्चा झाल्यामुळे शहाजीबापू पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझा आणि त्या पाच कोटी रुपयांचा काहीही संबंध नाही. तालुक्यात माझे हजारोच्या संख्येनेक कार्यकर्ते आहेत. शिवापूर टोलनाक्यावर 5 कोटी रुपये पकडण्यात आल्याचे मला माध्यमातील वृत्तातूनच समजले. या रमकेशी माझा तसेच माझ्या कुटुंबाशी कसलाही संबंध नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

COMMENTS