Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी केला शंखनाद

जालना : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी रविवारी अंतरवाली सराटीतून आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवड

Aurangabad : मध्यवर्ती संघटनेचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (Video)
एमआयडीसीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा खा.इम्तियाज जलिल यांचा आरोप.
लाडकी बहीण योजनेत भावांची घुसखोरी

जालना : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी रविवारी अंतरवाली सराटीतून आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरणार असल्याची घोषणा करत निवडणुकीचा शंखनाद केला आहे.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, जिथे उमेदवार निवडणून येण्याची शक्यता आहे तिथेच आपले उमेदवार उभे करा. याचबरोबर एससी आणि एसटीच्या जागा असलेल्या ठिकणी आपला उमेदवार द्यायचा नाही. जे कोणी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, त्या सर्वांनी अर्ज भरावेत. अर्ज भरण्याच्या शेवटीच्या दिवसापर्यंत मी मतदारसंघांचा अंदाज घेऊन कोणाचा अर्ज ठेवायचा आणि कोणाचा मागे घ्यायचा याचा निर्णय देईल.मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला आता निर्णायक वळण येणार आहे. आता हिशेबच होणार आहे. बदलाच घेणार आहोत. आमच्या समाजाची शैक्षणिक आणि सामाजिक संधी हिरावून घेणार्‍या सरकारला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी सरकारवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत असताना जरांगे यांच्या संतप्त वक्तव्याने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिकच तापले आहे. जरांगे यांनी सरकारवर आणि भाजपच्या नेतृत्वावर आरोप केले की त्यांनी सूडबुद्धीने मराठा समाजाला लक्ष्य केले आहे. त्यांच्या मते ओबीसींमधील काही जातींना आरक्षण देण्यात आले परंतु मराठा समाजाला आरक्षण नाकारले गेले. आमच्या समाजाच्या विकासाच्या संधींवर गदा आणण्यात आली आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने मराठ्यांची घरे उन्हात बांधली आहेत. फडणवीस अत्यंत क्रुर माणूस आहे, असे म्हणत टीकास्त्रही डागले आहे. सरकारने आमच्यावर ही वेळ आणली आहे. मविआ असो की महायुती असो आम्हाला कुणाचेच ऐकायचे नाही. लोकांना दोन्हीकडील राजकीय नेत्यांचे नावाने राग येत आहे. मराठा समाजाची काय चूक आहे की 70 वर्षे तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही. आता या सर्व गोष्टीचा हिशोब होणार. मी देत नाही ही भूमिका घेणार्‍यांना आम्ही पाडल्याशिवाय सोडणार नाही.

महायुती आणि महाविकास आघाडी सख्खे मावसभाऊ
महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही सख्खे मावसभाऊ आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. आपण उमेदवार उभे करायचे म्हटले तर महायुतीला आनंद होतो आणि पाडायचे म्हटले तर महाविकास आघाडीला आनंद होतो. यांच्या याद्या दिल्लीत पडून आहेत. पण त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे, असे जरांगे म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे यांनी बैठकीमध्ये उमेदवार उभे करायचे की पाडायये याबाबत समाज बांधवांचे मत जाणून घेतले. तसेच माझी राजकारणाकडे जाण्याची किंवा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असे मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले. आपण राजकारणात राहूच नये, असेही जरांगे यावेळी म्हणाले.

COMMENTS