Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावकाराकडून शेतकर्‍यास जीवे मारण्याची धमकी; राहुरी फॅक्टरी येथील घटना

देवळाली प्रवरा :राहुरी फॅक्टरी येथील खासगी सावकारी करणार्‍या पिता-पुत्रांच्या जाचास कंटाळलेल्या वडनेर येथील शेतकरी तरुणाने पोलिसांकडे धाव घेत साव

संगमनेरमध्ये पावणे दोन लाखाचे गोमांस पकडले
निरंजन जाधव यांनी अमेरिकेतून मिळवली पदवी
विविध मागण्यांसाठी हिवताप कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

देवळाली प्रवरा :राहुरी फॅक्टरी येथील खासगी सावकारी करणार्‍या पिता-पुत्रांच्या जाचास कंटाळलेल्या वडनेर येथील शेतकरी तरुणाने पोलिसांकडे धाव घेत सावकराने बळकावलेली शेतजमीन व घरातील महिलांचे दागिने परत मिळावे यासाठी तक्रारी अर्ज दिला आहे.
वडनेर येथील हौशाबापु विठ्ठल बलमे यांनी राहुरी पोलिस ठाणे व सहायक निबंधक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राहुरी फॅक्टरी येथील संजय कांतीलाल भंडारी,प्रशांत संजय भंडारी यांच्याकडून 4 वर्षापूर्वी डेअरी व्यवसायाकरीता 10 लाख व्याजाने घेतले होते. दोघांनी 10 लाख हातावर दिले, परंतु पैसे दिले बाबत कोणताही पुरावा नसल्याने त्यांनी परत माझ्या खात्यावर 10 लाख टाकले व माझ्याकडून सदर 10 लाख रोख स्वरुपात काढुन घेतले. सदर कॅश क्रेडीट हे त्यांनी त्यांच्या सुनेच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. 10 लाखास मी दरमहा एक लाख रुपये व्याज देत होतो. महिना 10 टक्के असे 35 महिने मी सदरचे व्याज भरले. त्यानंतर माझ्याकडे दरमहाचे होणारे व्याजाचे पैसे नसल्याने दोघांनी आईचे, बायकोचे व आजीचे असे 9 तोळे सोने घरात येवुन नेले. तरीही त्यांची रक्कम कमी होत नाही असे सांगितले. त्यानंतर नावावर असलेल्या शेतजमिनीवर मी कर्ज काढुन देतो असे सांगून त्याने मॉरगेजच्या नावाखाली मी अडाणी असल्याने माझी जमिन त्यांची सुनेच्या नावावर करुन घेतली.तुझे सिबील खराब असल्याने तुझी जमिन तिच्या नावावर केली असे सांगितले. त्यानंतर आपण सुनबाईच्या नावावर कर्ज काढु असे सांगितले.परंतु सदर जमिनीवर त्यांनी कर्ज काढून दिले नाही.सदर जमिनीचा व्यवहार हा मला फसवुण केलेला आहे. माझी जमीन व 9 तोळे सोने मागायला गेलो तर तुझे हात पाय तोडू, तू ही जमीन आम्हाला विकली आहे. तुझा जमिनीशी व सोन्याशी काही संबंध नाही, जमिनीत यायचे सुध्दा नाही, आला तर आमच्या गाडीने तुला उडवुन देऊ अशी जिवे मारण्याची धमकी दिली. शेतीचे व डेअरीचे व इतर बँकचे असे सर्व रक्कम 45 लाख आजपर्यंत संजय व प्रशांत भंडारी यांना दिले आहे.तरीही अजूनही व्याजाची मागणी करत आहे. मी कर्जबाजारी झालो असून मला जिवे मारण्याची धमकी देत आहे.या दोन्ही सावकारांपासुन माझ्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.त्यांच्यावर सावकारकी गुन्हा अंतर्गत कार्यवाही व्हावी व न्याय मिळावा अथवा आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याने बलमे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

COMMENTS