Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साधूसंतांचा व देवीदेवतांचा अवमान करणार्‍यांना मतदान करणार नाही : वारकरी संप्रदायाचा ठराव

अकोले : साधूसंतांचा व देवीदेवतांचा अपमान करणार्‍या पक्षाला मतदान करणार नाही अन हिंदू समाजाने पण करू नये यासाठी जनजागृती करण्याचा ठराव वारकरी धर्म

गणेश भोसने बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये पटकावले ब्राँझपदक
राज्यसभेत महिला खासदारांवर मार्शलकरवी हल्ला ; काँगे्रसचा गंभीर आरोप l DAINIK LOKMNTHAN
आत्मा मालिकचे नीट परीक्षेत घवघवीत यश

अकोले : साधूसंतांचा व देवीदेवतांचा अपमान करणार्‍या पक्षाला मतदान करणार नाही अन हिंदू समाजाने पण करू नये यासाठी जनजागृती करण्याचा ठराव वारकरी धर्म परिषद मध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. अकोले येथील अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्टच्या वतीने वारकरी धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदे च्या अध्यक्षस्थानी पहिल्या सत्रात महामंडलेश्‍वर रामकृष्ण महाराज लहवितकर व दुसर्‍या सत्रात संत तुकाराम महाराज संस्थान नेवासाचे मठाधीपती उद्धव महाराज मंडलिक होते. यावेळी विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री माधवदास महाराज राठी, आमदार डॉ. किरण लहामटे, धर्मवीर अध्यात्मिक वारकरी आघाडी चे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अ‍ॅड. के.डी. धुमाळ आदी उपस्थित होते.
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपली संस्कृती जपण्याचे काम वारकरी करित असून हिंदू धर्मावर येणारे अनेक संकट येत आहे. राष्ट्र उभारणी साठी कार्य करण्याची जबाबदारी वारकरी पंथावर आहे. असे मत व्यक्त केले. उद्धव महाराज मंडलिक यांनी वारकरी संप्रदाया ला कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. वारकरी हा संस्कृतीने समृद्ध आहे, असे मत व्यक्त केले. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी राजसत्ता व धर्मसत्ता यांचा अनुबंध या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यात्मिक क्षेत्रासाठी केलल्या कामाबद्दल व त्यांच्या नेतृत्वातील सकल योजना यांची विशेष माहिती दिली. घराघरापर्यंत पोहचून 100% मतदान होईल त्यासाठी प्रयत्न करण्याबाबत उपस्थितांना विनंती केली. रामनाथ महाराज जाधव यांनी तालुक्यात रावण संघटना वाढीस लागल्या ची खंत व्यक्त केली. दत्ता महाराज भोर यांनी जे पक्ष धर्माला मानत नाही अस्या पक्षाच्या अध्यात्मिक आघाडी च्या पदासाठी वारकरी जातात ही खेदाची बाब असल्याचे म्हटले. गोविंद महाराज करंजकर यांनी वारकरी संप्रदाया मध्ये फुट पाडण्याची क्रिया राबवली जात आहे अस मत व्यक्त केले. महामंडलेश्‍वर बाळनाथ महाराज सरस्वती यांनी आपण माणसे पेरणे आवश्यक आहे. अधर्म कमी करायचा असेल तर संघटन महत्वाचे आहे. रावण संघटनेच्या मागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. असे मत व्यक्त केले. इस्लाम, इसाई सारख्या अनेक समस्या आहेत. मात्र आदिवासी समाजामध्ये आपण जातो का? पुराण कथा न सांगता आजची सद्य स्थिती वर बोलले पाहिजे. वारकर्‍यांनी महिन्यातून एकदा तरी एकत्र यावेत. हृदयातील देव तोडण्याची प्रक्रिया राबविली जाते. असे मत रमेश महाराज क्षीरसागर यांनी व्यक्त केले. देशाचे अनेक शिक्षण मंत्री मुस्लिम असल्याने हिंदू समाज शिक्षण शिकवले नाही. लव्ह जिहाद मुळे महिला संकटात असून हिंदूची लोकसंख्या कमी होत असून मुस्लिमची वाढत आहे. तीन राज्यात हिंदू अल्पसंख्यांक झाले आहे. लँड जिहाद च्या माध्यमातून वक्फ बोर्ड आज जमीन गिळंकृत करीत आहे. आज हिंदू ना काही व्यवसाय करण्याची लाज वाटत आहे ते व्यवसाय दुसर्‍या धर्माकडे जाईल. व्होट जिहाद मधून हिंदुत्ववादी विचारांना पराभूत करण्याचा मानस केला जातो. विश्‍व हिंदू परिषदे चे अनिरुद्ध पंडित यांनी विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक महाराज देशमुख, राजेंद्र महाराज नवले, चंद्रकांत महाराज चौधरी, सुनील महाराज मंगळापुरकर व्यंकटेश महाराज सोनवणे, संदीप महाराज सावंत, राजेंद्र महाराज सदगीर, गणेश महाराज वाकचौरे, अरुण महाराज शिर्के, विवेक महाराज केदार, किशोर महाराज धुमाळ, संकेत महाराज आरोटे, रामनाथ मुतडक, नितीन महाराज गोडसे यांनी विशेष प्रयत्न केले.

COMMENTS