Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संदीप कोतकर यांच्यावरील जिल्हाबंदी उठवली

अहिल्यानगर ः विधानसभेची निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर नगर शहरात होणारी विधानसभा निवडणूक देखील रंगत होण्याची शक्यता आहे. कारण माजी महापौर संदीप कोत

जामखेड शहरात नागरी सुविधांचा बोजवारा
समाधान ही जीवनातील खरी आनंदनिर्मित कमाई असते – गुलाबराव पादिर
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार नगरपालिका निवडणूक लढवणार : सागर राठोड

अहिल्यानगर ः विधानसभेची निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर नगर शहरात होणारी विधानसभा निवडणूक देखील रंगत होण्याची शक्यता आहे. कारण माजी महापौर संदीप कोतकर नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते, मात्र त्यांना जिल्हाबंदीचा अडसर होता. मात्र शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कोतकर यांच्यावरील जिल्हाबंदीची अट शिथील करण्यात आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येे जल्लोषांचे वातावरण आहे. संदीप कोतकर यांच्या जिल्हा बंदीवरील स्थगितीचा आदेश येताच त्यांच्या समर्थकांनी नगर शहरासह केडगाव उपनगरात जल्लोष केला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, माजी महापौर संदीप कोतकर यांना एका प्रकरणात शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात कोतकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यानुसार या निकालाला स्थगिती देण्यात आली. याच दरम्यान, कोतकर यांना जामिन देण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर नगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जाहीर करताना त्यांच्यासमोर जिल्हा बंदीचे मोठे संकट होते. जिल्हा बंदीची अट उठवावी यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई केली. त्यास अखेर यश आले. त्यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली आहे.

ReplyForwardAdd reaction

COMMENTS