मुंबई : राज्यात भाजप आणि महायुतीच्या विरोधात वातावरण असल्यामुळे आपल्या पराभवाची त्यांना खात्री असल्यामुळेच ते मतदार याद्यांमध्ये गोंधळ करीत रडीचा
मुंबई : राज्यात भाजप आणि महायुतीच्या विरोधात वातावरण असल्यामुळे आपल्या पराभवाची त्यांना खात्री असल्यामुळेच ते मतदार याद्यांमध्ये गोंधळ करीत रडीचा डाव खेळत आहे. त्याच मानसिकतेतून त्यांनी मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, अंबादास दानवे, शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पटोले म्हणाले की, मतदार यादीमधून नावे गहाळ होण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट हात असल्याचा गंभीर आरोप सुद्धा नाना पटोले यांनी केला. हिंमत असेल तर समोरून लढा, भाजपचा रडीचा डाव करून जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात पटोले यांनी केला. पटोले यांनी यावेळी श्रीमती किरण गाडेकर (सरपंच गाव तेलाना, ता. चिखली, जि.बुलढाणा) यांचा या संदर्भातील व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर केला. गाडेकर यांनी मतदारयादीतून चुकीच्या पद्धतीने नावे कमी केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फॉर्म 7 नंबरसह योजनादूतांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी आयोगाकडे करणार असल्याचे म्हटले आहे. पटोले म्हणाले की, प्रत्येकाने मतदार यादीमध्ये आपले नाव चेक करा. हरतील म्हणून ते रडीचा डाव करत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीकडून योजनादूत बोगस असून त्यांची नियुक्ती तत्काळ रद्द करा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. महाराष्ट्राची तिजोरी यांच्यापासून वाचवली पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की फॉर्म 7 भरून प्रत्येक मतदारसंघांमध्ये 5 हजार नावे कमी करण्याच्या षड्यंत्र रचलं जात आहे. जिवंत माणसे मृत दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चिखलीमध्ये 2600 मतदान रद्द ?
नाना पटोले यांनी तेल्हारा गावच्या सरपंच महिलेचा व्हिडिओ दाखवला यात मतदार यादीतील नावे वगळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या गावातील काही लोकांची नावे वगळण्यात आल्याचे समोर आल्याचे महिला सांगत आहे. चिखलीमध्ये गेल्या 10 दिवसात 2600 मतदान रद्द करण्यात आले. तिथे भाजपच्या उमेदवार आहेत.
COMMENTS