Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीला बंडखोरीचे ग्रहण ; तेली, साळुंखे, बनकर यांनी हाती घेतली मशाल

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने येतांना दिसून येत आहे. मात्र त्यातच महायुतीमध्ये तीन प

Vasai : वसईत पोलिसांची दादागिरी दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण (Video)
पाटण-कोयना मार्गावरील अपघातात स्विफ्टचा चक्काचूर, 3 गंभीर जखमी
दांडिया स्पर्धेत श्री चौंडेश्‍वरी महिला मंचचा द्वितीय क्रमांक

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने येतांना दिसून येत आहे. मात्र त्यातच महायुतीमध्ये तीन पक्ष असल्यामुळे आणि भाजप सर्वाधिक जागा लढणार असल्यामुळे अनेकांना जागा मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक इच्छूक महायुतीतून बंडखोरी करतांना दिसून येत आहे. माजी आमदार राजन तेली, सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे, सिल्लोड मतदारसंघातील भाजपचे नेते सुरेश बनकर यांनीही ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, मध्यंतरी हॉस्पिटलची वारी करावी लागली होती. डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले होते, पण हरामांना घालवायचे असल्यामुळे आराम तरी किती दिवस करणार, असे म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली. दीपक साळुंखे आणि राजन तेली यांच्या पक्षप्रवेशामुळे कामाला मुहूर्त चांगला मिळाला आहे. यंदाची निवडणूक सोपी नाही. दीपक साळुंखे शिवसेनेत आले म्हणजे आपला विजय नक्की हे माहीत आहे. पण तुम्ही आजपासून मतदारसंघातील घराघरांत आपली मशाल पोहोचवली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलतांना राजन तेली म्हणाले की, मी भावनेच्या भरात नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षात काहीच काम केले नाही. त्यामुळे दीपक केसरकर यांना उमेदवारी देण्याला माझा विरोध होता. भाजपच्या नेत्यांशी मी याबद्दल बोललो. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल मला कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. नारायण राणे यांच्याबद्दल सुद्धा माझे काही म्हणणे नाही. फक्त त्यांचा मुलगा नितेश राणे त्याचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघांमध्ये कुरघोड्या करत आहे आणि त्याचा त्रास आम्हाला व्हायचा. हे मी अनेकदा सांगितले, तरी काहीच होत नसल्याने आता मी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे राजन तेली यांनी सांगितले. सावंतवाडीतून उमेदवारी मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही. जो आदेश येईल त्यानुसार मी काम करेन. पण सावंतवाडीमधून जर मला उमेदवारी मिळाली तर दीपक केसरकर यांचा पराभव निश्‍चित आहे आणि तशी तयारी मी केली आहे, असे राजन तेली यांनी म्हटले. राणे यांनी भाजपमध्ये आपले खच्चीकरण केल्याचा आरोप राजन तेली यांनी केला होता. याच राजन तेली यांची गणना एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थकांमध्ये व्हायची. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी नितेश राणे आणि राजन तेली यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता. नितेश राणे यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे, असे राजन तेली यांनी म्हटले होते. यानंतर राजन तेली यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी वातावरण प्रचंड तापले होते. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजन तेली यांच्या घरावर दगडफेक झाली होती.

ढोबळे, शिंदे, चव्हाण तुतारी घेणार हाती ?
भाजपचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार बबनराव शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सतीश चव्हाण यांनी खासदार शरद पवारांची भेट घेतल्यामुळे ते तुतारी हाती घेणार असल्याचे जवळपास स्पष्ट होतांना दिसून येत आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. नुकतेच ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन भाजपचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. भाजपमध्ये मागील 10 वर्षांपासून डावलले जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी या पदाधिकार्‍यांनी ढोबळे यांच्याकडे केली होती. त्यामुळे लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

COMMENTS