Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदार यादीत नाव नोंदणीची 19 ऑक्टोबरपर्यंत अखेरची संधी

मुबंई : अजून ही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनला

महापालिकेने केला डॉक्टरांचा सन्मान ; मनपा आरोग्य समितीचा पुढाकार
तपास यंत्रणा कुणाच्या इशार्‍यावर काम करतात ?
वंचितांचे प्रतिबिंब !

मुबंई : अजून ही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकता. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले.

COMMENTS