Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीला निवडणुकीआधीच तडा !

महादेव जानकरांनी सोडली साथ ; स्वबळावर लढण्याची केली घोषणा

मुंबई :विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महायुतीचे अजूनही जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यातच मित्रपक्षांना किती जागा सोडणार याचीही घेाषणा झाल

नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्यावर तिघांनी हल्ला केला 
भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अखेर घेतली माघार
कर्तव्यादार दारू पिऊन आलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचे निलंबन

मुंबई :विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महायुतीचे अजूनही जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यातच मित्रपक्षांना किती जागा सोडणार याचीही घेाषणा झालेली नसल्यामुळे महायुतीचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्ष अर्थात रासप महायुतीतून बाहेर पडला आहे. महादेव जानकर यांनी बुधवारी आपण महायुतीतून बाहेर पडत असून विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याची चर्चा होती.
यासंदर्भात बोलतांना जानकर म्हणाले की, कोणावरही नाराज असण्याचा प्रश्‍न नाही. आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. लोकसभेला आम्हाला एक जागा देण्यात आली होती. पण आम्हाला विधानसभेत मोठं यश मिळवायचं आहे. भाजप व काँग्रेसच्या तोडीचा पक्ष आम्हाला व्हायचं आहे. विधानसभेतील 288 मतदारसंघांतून आमच्या पक्षातून निवडणूक लढण्यासाठी दोन-दोन, तीन-तीन अर्ज आले आहेत. त्यामुळं आमची ताकद आजमावून बघण्यासाठी आम्ही स्वबळावर लढणार आहोत, असं जानकर यांनी स्पष्ट केले. जानकर यांनी महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी 40 ते 50 जागांची मागणी केली होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता राज्यात सर्व जागा स्वबळावर लढणार आहेत. महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असे लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीला रामराम केल्यानंतर आता महादेव जानकर यांचा पक्ष राज्यात किती जागा लढवणार हे पाहावे लागेल. परंतु महादेव जानकरांच्या या निर्णयामुळे महायुतीला मात्र मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आता भाजप आणि महायुतीकडून जानकरांची नाराजी दूर केली जाणार का हे पाहावे लागेल. महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. राज्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 2014 पासून ते युतीसोबत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदही देण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून त्यांनी परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, तिथे त्यांचा पराभव झाला.

या जिल्ह्यात महायुतीला बसणार फटका
सोलापूर, अहिल्यानगर, बारामती, इंदापूर, कर्जत-जामखेड, मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना अशा जिल्ह्यांत जानकर यांच्या रासपचा चांगला प्रभाव आहे. मराठा, ओबीसी, आदिवासींच्या आरक्षण प्रश्‍नामुळं राज्यात सध्या सामाजिक तणाव आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. त्याचे पडसाद राज्याच्या निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे. अशा वेळी धनगर समाजाचा चेहरा दूर जाणं महायुतीला परवडणारं नाही. रासप स्वतंत्र लढल्यास महायुतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

COMMENTS