मुंबई :अडीच वर्षांपूर्वी आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही रखडलेल्या प्रकल्पांना गती देत, विविध लोकप्रिय योजना सादर केल्या. महिलांना सक्षम करण्यासाठी
मुंबई :अडीच वर्षांपूर्वी आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही रखडलेल्या प्रकल्पांना गती देत, विविध लोकप्रिय योजना सादर केल्या. महिलांना सक्षम करण्यासाठी निर्णय घेतले, महायुतीचे काम हीच आमची ओळख असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. महायुती सरकारकडेनू अडीच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा असेलेले रिपोर्ट काडे बुधवारी पत्रकार परिषदेत सादर केले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे रिपोर्ट कार्ड संक्षिप्त आहे. विकास कामे एका रिपोर्ट कार्डमध्ये मावू शकत नाही. महायुती सरकारने मागील 2 वर्षात केलेल्या कामांचे आपण सर्व साक्षीदार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र 1 क्रमांकावर आहे. अडीच वर्षाचा कालावधीत सर्व प्रकल्प मुंबईचा कोस्टल हायवे, मेट्रो, अटल सेतू, समृद्धी हायवे, मुंबई-पुणे यांचं हायवे, कारशेड, मिसिंग लिंक करत आहोत, ज्यामुळे मुंबई-पुणे प्रवास आणखी कालावधी कमी होईल. उद्योग गेले, उद्योग पळवले, असे विरोधक सांगत आहेत. पण गुजरात, कर्नाटक मागे पडले आहे. आज महाराष्ट्र 1 ल्या क्रमांकावर असल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. उद्योजकांना आम्ही रेड कार्पेट दिले आहे. जे उद्योग आले आहेत, ते वाढत आहेत. गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात उद्योग आले आहेत. लोकांना रोजगार मिळत आहे. विकास, उद्योग, कल्याणकारी योजना आणल्या. हे पाहूनच विरोधकांची पायाखालची वाळू सरकली. 2 कोटी 50 लाखांचे आमचे टार्गेट होते. आम्ही 2 कोटी 30 लाख टार्गेट पूर्ण केले आहे. आमचा जो पैसे देण्याचा उद्देश आहे तो स्वच्छ आहे. लेक लाडकी लखपती झाली असल्याचा दावा केला.
विरोधकांनी आरोप करतांना तारतम्य बाळगावे : अजित पवार
विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. आरोप करताना विरोधकांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे. आमच्या योजनांना अभूतपूर्व प्रतिसाद राज्यातील जनतेचा मिळाला आहे. त्यामुळे विरोधक थोडेसे गडबडलेले आहेत. काही जण घाबरलेले असल्याचा आरोप देखील करत आहेत. मात्र, मी गडबडले असल्याचे म्हणेल, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.
मविआच गुजरातची ब्रँड अॅम्बेसेडर : फडणवीस
राज्यातील महाविकास आघाडीतील नेते गुजरात राज्याचे ब्रँड अॅम्बेसेडर असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सध्या देशात महाराष्ट्र नंबर एकचे राज्य असून देखील महाविकास आघाडीचे नेते गुजरातचे गुणगान गात आहेत. या माध्यमातून ते महाराष्ट्राला कमी लेखत असल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर गृहमंत्रालयावर होत असलेल्या आरोपांवर देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांचा गृहमंत्री स्वतः जेलमध्ये गेला, तेच आता आरोप करत असल्याचेफडणवीस यांनी म्हटले आहे.
COMMENTS