मुंबई : महाराष्ट्रात प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी महायुतीपासून जवळपास फारकत घेत तिसर्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र बच्चू कडू यां
मुंबई : महाराष्ट्रात प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी महायुतीपासून जवळपास फारकत घेत तिसर्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र बच्चू कडू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत दोघांनी जवळपास तासभर चर्चा केल्यामुळे बच्चू कडू यांची मनधरणी केल्याची चर्चा सुरू आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच ही भेट पार पडली. त्यामुळे शिंदे बच्चू कडू यांना सोबत घेण्यासाठी आग्रही असून त्यांनी त्यादृष्टीने बच्चू कडू यांची मनधरणी केल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात बच्चू कडू यांनी माध्यमांशी कोणतेही भाष्य केले नाही, त्यामुळे या चर्चेतील तपशील समोर येवू शकलेला नाही. यावेळी शिवसेना नेते संजय शिरसाट, आनंदराव अडसूळ व प्रताप सरनाईक उपस्थित आहेत. त्यात बच्चू कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी गेल्याच महिन्यात राजू शेट्टी, युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मदतीने परिवर्तन महाशक्तीची घोषणा केली होती. तिसर्या आघाडीच्या रुपात आपण मतदारांना पर्याय देणार असल्याचे त्यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात सांगितले होते.
COMMENTS