Homeताज्या बातम्यादेश

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील श्रमशक्ती भवन येथे 5 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्यांची यादी जा

विधानसभे पाठोपाठ जिल्हा बँकेतही आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव; कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या सातारा कार्यालयावर दगडफेक
ऊसदर आंदोलनाच्या गुन्ह्यातून राजू शेट्टीसह सर्वजण निर्दोष
वाकुर्डे येथे जनावराच्या गोठ्यास आग; 3 जनावरांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील श्रमशक्ती भवन येथे 5 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने 38 पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. यात 5 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार, 2023 साठी संयुक्त विजेत्यांसह 09 श्रेणींमधल्या विजेत्यांचा समावेश आहे. हे पुरस्कार पुढील 09 श्रेणीतील आहेत: सर्वोत्कृष्ट राज्य, सर्वोत्कृष्ट जिल्हा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था, सर्वोत्कृष्ट शाळा किंवा महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट उद्योग, सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ता संघ, सर्वोत्कृष्ट संस्था (शाळा किंवा महाविद्यालयाव्यतिरिक्त), आणि सर्वोत्कृष्ट नागरी संस्था या पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये, प्रथम पारितोषिक ओडिशाला प्रदान करण्यात आले आहे, उत्तर प्रदेशाने दुसरे तर गुजरात आणि पुद्दुचेरीने संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले आहे. प्रत्येक पुरस्कार विजेत्याला प्रशस्तीपत्र आणि चषक तसेच काही श्रेणींमध्ये रोख पारितोषिके दिली जातील. 5 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार, 2023 साठी पुरस्कार वितरण समारंभ 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.00 नवी दिल्लीतील विज्ञान भवनातील वाजता प्लेनरी हॉल मध्ये होणार आहे, असे जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने जाहीर केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. सरकारची ‘जल समृद्ध भारता’ची संकल्पना साध्य करण्यासाठी देशभरातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या चांगल्या कामावर आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय जल पुरस्कार दिले जातात. पाण्याच्या महत्त्वाविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे तसेच त्यांना सर्वोत्तम पाणी वापर पद्धती अवलंबण्यास प्रवृत्त करणे यासाठी हे पुरस्कार आहेत. हा कार्यक्रम सर्व लोक आणि संस्थांना जलस्रोत संवर्धन तसेच व्यवस्थापन क्रियांमध्ये मजबूत भागीदारी आणि लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी एक संधी प्रदान करतो.

COMMENTS