Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तेत परिवर्तन करणे हाच पर्याय : खा. शरद पवार

मुंबई :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. राज्यात सध्या अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तधार्‍या

मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने वाचवले 44 प्रवाशांचे जीव
दोन दिवसांपासून पुणतांबामार्गे बस वाहतूक बंद
महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक

मुंबई :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. राज्यात सध्या अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तधार्‍यांना राज्य व्यवस्थित चालवता येत नाही. विधानसभा निवडणुकीला फार थोडे दिवस राहिले आहे. दोन ते तीन दिवसात आचारसंहिता लागू शकते. निवडणुकीची प्रक्रिया संपल्याशिवाय यांना उत्तर मिळणार नाही. लोकांसमोर जाणे आणि लोकांची सुटका करायची आहे. सत्तेत परिवर्तन करणे हाच पर्याय आहे. त्यासाठी लोकांनी साथ द्यावी, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी रविवारी केले. रविवारी महाविकास आघाडीच्या वतीनेपत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत गद्दारांचा पंचनामा नावाने पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे, नाना पटोले, सुप्रिया सुळे, अनिल देसाई, आदित्य ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा, गायकवाड, संजय राऊत, अरविंद सावंत उपस्थित होते.
यावेळी बोलतांना काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम महायुतीने केले आहे. ते पाप जनतेसमोर उघडकीस आणण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत, असे नाना पटोले म्हणाले. ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विरोध केला, त्याच विचाराची लोक सत्तेत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली. मुंबईत काल माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. यामुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कालपर्यंत शाळेत शिकणार्‍या मुली, राज्यातील महिला तसेच लोक सुरक्षित नाहीत, असे म्हणायचो. आता सत्ताधारी पक्षातील नेतेही सुरक्षित नसल्याचे दिसत आहेत. तर मग राज्यातील जनतेची आज काय स्थिती असेल, हे कालच्या घटनेतून स्पष्ट होत असल्याची टीका ही पटोले यांनी केली.

आगामी निवडणुकीत हे सरकार घालवू :उद्धव ठाकरे
गद्दारी केवळ शिवसेना किंवा शरद पवार यांच्याशी झाली नसून महाराष्ट्रासोबत झाली आहे. महाराष्ट्र मोदी-शहा यांच्या गुलामाची वसाहत झाली, अशा पद्धतीने सरकार चालवत करत आहे. आगामी निवडणुकीत हे सरकार घालवावे लागेल. दोन पोलिस कमिशन असणारे मुंबई देशातील एकमेव शहर असेल. लाडक्यांना कमिशनर करा, पण कारभाराचे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. महिला, राजकारणी, सत्ताधारी पक्षातील नेते असुरक्षित आहेत. गद्दारांना दिलेली सुरक्षा जनतेसाठी का वापरत नाहीत, असा टोला ठाकरे यांनी लगावला. काही महिन्यांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. गृहमंत्री मोठमोठी होर्डिंग लावतात, पण कारभाराची जबाबदारी घेत नाहीत, अशी टीका ठाकरेंनी फडणवीसांवर केली. गाडीखाली कुत्रे आले तरी राजीनामा मागताल, असे ते उत्तर देतात. तुमच्या राज्यात सर्वसामान्य जनतेच्या जीवाची तुलना कुत्र्याशी करत आहात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

COMMENTS