Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दांडिया स्पर्धेत श्री चौंडेश्‍वरी महिला मंचचा द्वितीय क्रमांक

पाथर्डी : शहरातील सुवर्णयुग परिवार महिला ट्रस्टने नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भव्य दांडिया स्पर्धेत शहरातील श्री चौंडेश्‍वरी महिला मंच,

पिकविमा भरपाई मिळण्यासाठी मतदारसंघात पाहणी सुरु ः आ.काळे
एका वर्षात नोकरी देणारा हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम ः परशराम साबळे
बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला

पाथर्डी : शहरातील सुवर्णयुग परिवार महिला ट्रस्टने नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भव्य दांडिया स्पर्धेत शहरातील श्री चौंडेश्‍वरी महिला मंच,अष्टवाडा मंडळाने बहारदार गरबा खेळत द्वितीय क्रमांक पटकावला.
नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील कै.माधवराव निर्‍हाळी खुले नाट्यगृहात दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.नेहमी सांस्कृतिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या सुवर्णयुग परिवार महिला ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या दांडिया स्पर्धेला शहरासह बाहेरच्या तालुक्यातून आलेले स्पर्धक देखील सहभागी झाले होते.यामध्ये द्वितीय क्रमांक श्री चौंडेश्‍वरी महिला मंच अष्टवाडा या मंडळाने पटकावला.मंडळातील महिलांनी बहारदार दांडिया नृत्य करत उपस्थित प्रेक्षकांचे डोळ्यांचे पारणे फेडले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे,महिला मंडळाच्या अध्यक्षा नम्रता दराडे,नीता जिरेसाळ,शिल्पा गुगळे,अनुराधा मानूरकर,कल्याणी पावटेकर,प्राची दराडे,शारदा भागवत,आरती पंडित यांच्या हस्ते श्री चौंडेश्‍वरी मंडळाला रोख पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.श्री चौंडेश्‍वरी मंडळात आरती निर्‍हाळी,मंजू कोष्टी,शीतल कुलट,शीतल बडदे,स्मिता भालसिंग,माधुरी कुलट,जयश्री पंडित,मीनल कुलट,प्रीती भंडारी,जान्हवी निर्‍हाळी,स्नेहल निर्‍हाळी,कोमल शहाणे,रंजना मनेळ,सोनाली कुलट,अर्चना भावसार,दिपा कोष्टी,पूनम तरवडे,मनीषा पंडित,कु शुभ्रा पंडित यांनी सहभाग घेतला.तर या महिलांना दांडियासाठी एम.एम.निर्‍हाळी विद्यालयाचे शिक्षक संजय उरशिळे व आरती निर्‍हाळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS