हैदराबाद : भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. हैदराबाद क
हैदराबाद : भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित एका प्रकरणात ईडीने समन्स बजावले असून, अझरूद्दीन याने 20 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष असतांना अझरुद्दीन यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे. मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर बजावण्यात आलेले हे पहिलेच समन्स असून, त्यांना आज गुरुवारी ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे.दरम्यान, अझरुद्दीन यांची सप्टेंबर 2019 मध्ये हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जून 2021 मध्ये त्यांना आपले पद सोडावे लागले. निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. ईडीने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार्यांविरुद्धही मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीने तेलंगणातील 9 ठिकाणी छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती अझरुद्दीन यांच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप आहे.
COMMENTS