मुंबई : ऑक्टोबर महिन्याची सुरूवात महागाईच्या धक्क्यांनी झाली आहे. मंगळवारी व्यावसायिक सिलिंडर तब्बल 48 रूपयांनी महागला आहे. त्यामुळे राजधानीत व्य
मुंबई : ऑक्टोबर महिन्याची सुरूवात महागाईच्या धक्क्यांनी झाली आहे. मंगळवारी व्यावसायिक सिलिंडर तब्बल 48 रूपयांनी महागला आहे. त्यामुळे राजधानीत व्यावसायिक सिलिंडर 1740 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर पीपीएफ आणि सुकन्या खात्याशी संबंधित नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. पॅन कार्ड बनवण्यासंबंधीचे नियमही बदलण्यात आले आहेत.
ऑगस्ट महिन्यापासून सलग ऑक्टोबरपर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये ही वाढ झाली आहे. तर 14 किलोच्या गॅस सिलेंडरमध्ये कुठलाही बदल झाला नाही. सणासुदीत गॅस सिलेंडरचा भाव वधारल्याने त्यांना झटका बसला आहे. दिल्ली ते चेन्नई आणि मुंबई ते कोलकत्ता अशी वाढ झाली आहे. 19 किलोच्या गॅस सिलेंडरची नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. राजधानी दिल्लीसह इतर महागनगरातील किंमतीत वाढ झाली आहे. सणासुदीत आता हॉटेलिंग आणि दिवाळीचा फराळ महागणार आहे. बाहेरून फराळ खरेदी करणार्या ग्राहकांना त्याचा फटका बसेल. सर्वच किंमती वधारलेल्या असताना गॅस दरवाढीमुळे फराळ महाग मिळेल. मुंबईत 19 किलोचा गॅसची किंमत सप्टेंबर महिन्यात 1605 रुपयांनी वाढवून 1644 रुपयांवर पोहचली. त्यात आता पु्न्हा एकदा वाढ झाली. आता देशाच्या आर्थिक राजधानीत आता व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1692.50 रुपये आहे.
COMMENTS