Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोपीने थेट पोलिस अधिकार्‍याच्या अंगावर घातली गाडी

पिंपरी चिंचवडचे एपीआय थोडक्यात बचावले

पुणे ः  पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी आरोपीने थेट पोलिसाच्याच अंगावर गाडी घातल्याचा प्रकार समोर आला आहे. 26 सप्टेंबर रोजी जयपूर येथे ही घटना घडली अ

गुंगीचे औषध घालून महाविद्यालयीन तरुणीवर कब्बडीपटूचा बलात्कार
मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे LokNews24
नगरच्या उपनगरात…पोलिसाच्या घरी चोरीचा प्रयत्न

पुणे ः  पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी आरोपीने थेट पोलिसाच्याच अंगावर गाडी घातल्याचा प्रकार समोर आला आहे. 26 सप्टेंबर रोजी जयपूर येथे ही घटना घडली असून हा थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. पिंपरी चिंचवड येथील एपीआय प्रवीण स्वामी हे आरोपींना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी गाडीसमोर उभे राहिले होते. मात्र आरोपींनी थेट त्यांच्या अंगावर गाडी घातली. या घटनेत प्रवीण स्वामी थोडक्यात बचावले आहेत. आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी आरोपींवर जयपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अक्षीत आणि त्याचा साथीदार मयंक गोयल हे दोघे पोलिस असल्याचे सांगत अनेकांना गंडा घालत होते. त्यांनी अलिकडेच पिंपरी चिंचवडमधील एकाला अटक करण्याची भीती दाखवत त्याच्याकडून सुमारे 1 कोटी रूपये उकळले होते. या प्रकरणाचा तपास करताना आरोपी हे राजस्थानातील जयपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना अटक करण्यासाठी एपीआय प्रवीण स्वामी हे पथकासह जयपूर येथे पोहेाचले. 26 सप्टेंबर रोजी स्वामींच्या पथकाने मयांक गोयलला सापळा रचून अटक केली. पोलिसांनी मयांकच्यामार्फत अक्षीतचा शोध घेतला. अक्षीत एका ठिकाणी काळ्या रंगाच्या गाडीत येणार असल्याचे समल्यानंतर पोलिसांनी तिथे सापळा रचला. अक्षीतला तिथे आल्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी गाडीला घेराव घातला. आरोपी पळून जाऊ नये, यासाठी एपीआय स्वामी यांनी जीवाची पर्वा न करता गाडीसमोर उभे राहिले. पथकातील इतर सदस्यांनी अक्षयला आत्मसमर्पण करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी सूचना देताच आरोपी अक्षीतने चालकाला गाडी एपीआय स्वामींच्या अंगावर घालण्यास सांगितले. चालकानेही कोणताही विचार न करता गाडी स्वामींच्या दिशेने नेली. पण स्वामी गाडी समोरून हटले नाही. चालकाने वेग वाढवताच स्वामींनी गाडीच्या बोनेटवर उडी मारली. गाडीचा वेग जास्त असल्याने ते दूर फेकल्या गेले. गाडीपासून दूर फेकल्या गेल्याने स्वामी हे थोडक्यात बचावले. अशाप्रकारे अक्षीत पोलिसांच्या जाळ्यातून निसटण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी अक्षीत आणि त्याचा सहकारी चालक दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जयपूरमध्येच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत असतानाच ती काळ्या रंगाची गाडी ताब्यात घेतली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

COMMENTS