Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत पुरवठा खंडीत केल्याने राहुरी तालुक्यातील ग्रामस्थांचा संताप

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील कणगर, गणेगाव, गुहा व चिंचविहिरे या परिसरात गेल्या तीन दिवसापासून  विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे ग्रामस्थ व

जामखेड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नासीर पठाण:
डोळे हलताना दिसले…पाणी पाजले आणि तो उठून बसला…
अहमदनगरचे जिल्हाधिकारी झारीतील शुक्राचार्य…

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील कणगर, गणेगाव, गुहा व चिंचविहिरे या परिसरात गेल्या तीन दिवसापासून  विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गात मोठा संताप व्यक्त होत आहे.महावितरण कर्मचारी यांना संपर्क केला तर ते उडवा उडीचे उत्तर देत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांच्या प्रश्‍नाला उत्तर द्यायचे नाही म्हणुन महावितरणाच्या कर्मचार्‍यांनी आपले मोबाईल स्विच ऑफ केले असल्यामुळे विज ग्राहकांमधुन संताप व्यक्त होत आहे.
          गेल्या तीन दिवसापासून कणगर , गणेगाव, गुहा व चिंचविहिरे परिसरातील गावठाण व वाड्या वस्त्यावर विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.विज पुरवठा खंडीत झाला की केला. विद्युत पुरवठा कोणत्या कारणाने खंडित झाला याची माहिती घेण्यासाठी वीज वितरणचे अधिकारी व  कर्मचारी यांना ग्रामस्थांनी संपर्क केला असता महावितरणाचे कर्मचारी उडवा उडीचे उत्तर देत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महावितरणाच्या वायरमन कर्मचार्‍यांनी विज ग्राहकांच्या सततच्या चौकशीला वैतागुन मोबाईल स्विच ऑफ केले आहे.त्यामुळे ग्रामस्थांतून आणखी संताप व्यक्त होत आहे .तीन दिवसापासून खंडित असलेल्या विद्युत पुरवठा कधीही सुरळीत होणार हाच प्रश्‍न ग्रामस्थांपुढे उभा राहिलेला आहे. खंडीत विज पुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

COMMENTS