Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगावर स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी परिसरात दुर्घटना

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी परिसरातील सुनील विश्‍वासराव यांच्या घरालगत असलेल्या बाथरूम दुरुस्तीचे काम करत असताना कामगाराच्या

प्रवरा नदीला पूर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्रांतीमध्ये मोठे योगदान

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी परिसरातील सुनील विश्‍वासराव यांच्या घरालगत असलेल्या बाथरूम दुरुस्तीचे काम करत असताना कामगाराच्या अंगावर बाथरूमचा स्लॅब कोसळून ढिगार्‍याखाली दबल्याने राहुरी फॅक्टरी (प्रसदनगर) येथील सुरेश दशरथ सोनटक्के हा तरुण कामगार गंभीर जखमी झाला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
           गुरूवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान कामगार मजूर सुरेश सोनटक्के हा दुरुस्तीचे काम करताना बाथरूमचा स्लॅब कोसळला. याचवेळी तो स्लॅबखाली दबला गेला. स्थानिक तरुणांनी तातडीने मदतीसाठी धावाधाव सुरू केली. जेसीबीच्या सहायाने व  स्थानिक तरुणांच्या मदतीने तब्बल दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर सुरेश सोनटक्के यास बाहेर काढण्यात आले. मात्र सुरेश याच्या पायास गंभीर दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी साई प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी रामेश्‍वर तोडमल, अभी सांगळे, निलेश त्रिभुवन, शरद साळवे, सूरज खरात, मयूर कदम, आशू सांगळे, प्रशांत शिंदे, गोरख नरोडे, आदींनी मदतकार्य केले. देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात अनेक इमारती जीर्ण व धोकादायक झाल्या असून मुख्याधिकारी  विकास नवाळे यांनी तात्काळ स्ट्रक्चरर ऑडिट करावे अशी  नागरिकांतून होत आहे.

पाहणी करूनच कारवाई करणार – या घटनेच्या संदर्भात मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्याशी भ्रमणभाष वरुन संपर्क साधला असता ते म्हणाले की, देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या वतीने जीर्ण झालेल्या इमारती बाबत वृत्तपञातून जाहिर नोटीस प्रसिद्ध करुन घर मालकांना प्रत्यक्ष नोटीस बजविल्या आहेत. अशा इमारती राहण्यासाठी वापर करु नये असे नोटीसात उल्लेख केलेला आहे. किरकोळ दुरुस्ती वगळता इतर दुरुस्ती करताना पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. राहुरी फँक्टरी येथील घटनेबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन कारवाई करण्या बाबत निर्णय घेण्यात येईल असे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले.

COMMENTS