Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी नोकरी महोत्सवातून दहा हजार तरुणांना नोकरीची संधी ः विवेक कोल्हे

कोपरगाव तालुका ः अलीकडे वाढत्या बेरोजगारीची समस्या कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.कोपरगाव मतदारसंघांत शिक्षण असून नोकरी मिळत

पुणतांबा परिसरातील बंधारे व पाझर तलाव ओव्हरफलोच्या पाण्याने भरून द्यावे ः विवेक कोल्हे
महाराजा होळकरांचे कार्य समाजासाठी स्फूर्तिदायक ः विवेक कोल्हे
पाणी प्रश्‍न सुटण्यासाठी व्यापक लढा उभारणार ः कोल्हे

कोपरगाव तालुका ः अलीकडे वाढत्या बेरोजगारीची समस्या कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.कोपरगाव मतदारसंघांत शिक्षण असून नोकरी मिळत नसल्याने नैराश्य, व्यसनाधिनता, गुन्हेगारी, आत्महत्या आणि आर्थिक अस्थिरता समोर येत आहे. या समस्येचे महत्व समजून घेत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी दहा हजार युवक युवतींना एका छताखाली थेट रोजगार मिळवून देण्यासाठी संजीवनी रोजगार महोत्सवाची घोषणा केली आहे.
5 ऑक्टोबर 2024 रोजी संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम, भक्त निवास या ठिकाणी सकाळी 9.00 वाजेपासून भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. शंभरहून अधिक कंपन्या आलेल्या तरुणांच्या मुलाखती घेणार आहेत.ज्या दिवशी मुलाखत त्याच दिवशी नोकरी हातात मिळणार आहे.ज्यांना आपल्या शैक्षणिक अर्हता नुसार नोकरी त्या दिवशी मिळणार नाही त्यांना जॉब कार्ड मिळणार असून त्यातून पुढील सहा महिने हजारो नोकरीच्या संधी व शाश्‍वती असणार आहे. गतवर्षी देशात जवळपास 1 कोटी 39 लाख पी एफ खाती उघडली गेली मात्र कोपरगाव तालुक्यात केवळ दहा कंपन्यांनी नवीन पी एफ खाती उघडल्याने देशाच्या तुलनेत आपण किती मागे पडलो आहोत यावर लक्ष वेधले गेले.
संजीवनी रोजगार महोत्सव ही सुवर्णसंधी आहे.हजारो युवक युवती यातून नव्या यशाला गवसणी घालतील. कोल्हे कुटुंबाने रोजगार निर्मितीला नेहमी प्राधान्य दिले आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सक्षमीकरण धोरण यशस्वी करण्यासाठी विवेक कोल्हे यांनी आनंदाची घोषणा केल्याने युवा वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोपरगावच्या सुशिक्षित युवकांचे दर्जेदार कंपनीत नोकरीचे स्वप्न आता घरबसल्या साकार होणार आहे यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोल्हे कुटुंबीय यांचे व्हिजन चर्चेचा विषय ठरते आहे. आय.टी.,नॉन आयटी, बँकिंग, ऑटो मोबाईल, मॅन्यूफॅक्चरिंग, केपीओ, बीपीओ, फार्मा, हॉस्पिटॅलिटी, आय.टी.आय, डिप्लोमा, सिक्युरिटी आदींसह विविध क्षेत्रातील तरुणांनी ुुु.ीरपक्षर्ळींरपळक्षेलषरळी.लेा या संकेतस्थळावर नोंदणी करून करावी असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी किरण रहाने, दीपक पवार, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, योगेश इंगळे आदी उपस्थित होते.

COMMENTS