Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यापार्‍यांनी केला आ. आशुतोष काळेंचा सत्कार

कोपरगाव शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु

कोपरगाव : कोपरगाव शहराला रविवार (दि.22) पासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांचे चिंतेचे ढग कायमचे दूर झाले असून शहरातील व्य

पिण्यासाठी निळवंडे व पालखेड कालव्याचे पाणी द्या
पश्‍चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी सकारात्मक
निळवंडे लाभ क्षेत्रातील पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या

कोपरगाव : कोपरगाव शहराला रविवार (दि.22) पासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांचे चिंतेचे ढग कायमचे दूर झाले असून शहरातील व्यापार्‍यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. पाणी प्रश्‍न सुटल्यामुळे निश्‍चितच व्यवसाय वृद्धी होणार आहे त्यामुळे कोपरगाव शहरातील व्यापार्‍यांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे.
ज्या प्रश्‍नामुळे कोपरगाव शहराचा विकास खुंटला होता व महिलांसाठी देखील रोजचेच मडे, त्याला कोण रडे अशी अवस्था झाली होती. असा जटील पाणी प्रश्‍न आ. आशुतोष काळे यांनी सोडविल्यामुळे कोपरगाव शहराला तीन दिवसाआड स्वच्छ पाणी पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे कोपरगावच्या महिला आनंदित झाल्या आहेच परंतु हा पाणी प्रश्‍न कायमचा सुटल्यामुळे शहरातील व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे. त्याबद्दल कोपरगाव शहरातील व्यापार्‍यांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार केला. यावेळी व्यापार्‍यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, पाणी प्रश्‍न रखडल्यामुळे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला मरगळ आली होती. व्यापारी वर्गाने हि मरगळ दूर होईल याची अपेक्षा जवळपास सोडली होती. कारण पाणी प्रश्‍न अनेक वर्षापासून प्रलंबित होता त्याच बरोबर कोपरगाव शहर देखील धुळगाव झाले होते. परंतु 2019 च्या विधानासभा निवडणुकीत विजयश्री गळ्यात पडल्यापासून आमदार आशुतोष काळे यांनी दोनच महिन्यात 5 नंबर साठवण तलावाचे काम सुरु केले. यासाठी ज्यांचे योगदान आहे त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आमचे कर्तव्य असून त्यामुळे त्यांच्याकडून कोपरगावचा यापेक्षा जास्त विकास होईल याबाबत आम्ही आशावादी असल्याचे सांगितले. यावेळी प्रवीण पाटणी, राहुल शिंदे, विशाल उदावंत, अनिकेत भडकवाडे, सचिन गायकवाड, योगेश अंभोरे उपस्थित होते.

COMMENTS