Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजार समितीच्या कारभाराची विकासाकडे वाटचाल: आ. मोनिका राजळे

पाथर्डी ः बाजार समितीचा कारभार विकासाकडे वाटचाल करत असून येणार्‍या काळात आणखी विकास कामे करत नावलौकिक उंचावण्यासाठी संचालक मंडळाने काम करावे असे

घोडच्या आवर्तनासाठी ग्रामस्थ व पाणी वापर संस्थेचा प्राणांतिक उपोषणाचा इशारा
शिर्डीत श्री रामनवमी उत्‍सवाला आजपासुन सुरूवात ; विविध कार्यक्रमांचे आयोजन
बिजनेस एक्स्पोची व्याप्ती वाढत जाणार – आमदार आशुतोष काळे

पाथर्डी ः बाजार समितीचा कारभार विकासाकडे वाटचाल करत असून येणार्‍या काळात आणखी विकास कामे करत नावलौकिक उंचावण्यासाठी संचालक मंडळाने काम करावे असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी त्या पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीची तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सभेमध्ये बोलत होत्या. या कार्यक्रमाआधी बाजार समितीत शेतकरी निवास व सौर ऊर्जा प्रकल्प कामाचा उदघाटन करण्यात आले. यावेळी सभापती सुभाष बर्डे, उपसभापती कुंडलिक आव्हाड, राहुल राजळे, अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, रामकिसन काकडे, बंडू पठाडे, विष्णुपंत अकोलकर, बंडूशेठ बोरुडे, नवनाथ आव्हाड आदी जण उपस्थित होते.

पुढे बोलताना राजळे यांनी म्हटले की, सहकार क्षेत्रातील संस्थेमध्ये पारदर्शकपणा ठेवल्यास त्या संस्थेची सर्वांगीण भरभराटी होते.बाजार समितीचा कारभार हाती घेतल्यापासून संचालक मंडळाने शेतकर्‍यांच्या सुविधांमध्ये भर पडत आहे.बाजार समितीच्या विकासासाठी आणखी काही योजना तयार असून येणार्‍या काळात त्या अंमलात आणून बदल घडवला जाईल.अहवाल वाचन सचिव बाळासाहेब बोरुडे यांनी प्रास्तविक सुभाष बर्डे तर सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी करून पांडुरंग लाड यांनी आभार मानले. 

COMMENTS