Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पडेगाव राहुरी रेल्वे मार्गावर रेल्वेची चाचणी यशस्वी

डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पांतर्गत ती धावली 130 च्या स्पीडने

राहुरी ः नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत पढेगाव ते राहुरी या 14 कि.मी. अंतराची चाचणी सोमवारी घेण्यात आली. नगर ते मनमाड रेल्वे मा

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला
कर्जत- जामखेडच्या ११५१ शिक्षकांना प्रशिक्षण
नगर अर्बन बँकेचे अधिकारी…आता रडारवर

राहुरी ः नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत पढेगाव ते राहुरी या 14 कि.मी. अंतराची चाचणी सोमवारी घेण्यात आली. नगर ते मनमाड रेल्वे मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार असून नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. पूर्ण रेल्वेमार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.
या पूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा, बेलापूर ते पढेगाव, निबळक ते वांबोरी, पुणतांबा ते कान्हेगाव या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. तर सोमवारी (दि. 23) रोजी 14 कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता एकूण 135 की. मी. अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती दीपक कुमार उप मुख्य अभियंता (बांधकाम) अहमदनगर यांनी दिली. मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वे गाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत . मात्र आता हा पुर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 130 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने, रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे .पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसर्‍या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे .सोमवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे. यावेळी ताशी 130 वेगाने धावली रेल्वे. या अधिकार्‍यांच्या उपस्थीतीत पढेगाव ते राहुरी द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी घेतली. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्यासह रेल्वेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS