Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचे नागरिक ठरता आहे बळी ः विवेक कोल्हे

कोपरगाव तालुका ः सावळीविहीर कोपरगाव रस्त्यावर अपघात होऊन मुजीब खान यांचे निधन झाले आहे.या रस्त्याला दर आठ दिवसाला एक घटना घडून अपघातांचे बळी नागर

डेंग्यूच्या साथीने कोपरगावकर त्रस्त, उपाययोजना करा ः विवेक कोल्हे
पाणी प्रश्‍न सुटण्यासाठी व्यापक लढा उभारणार ः कोल्हे
तुमच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करण्यासाठी आलो ः विवेक कोल्हे

कोपरगाव तालुका ः सावळीविहीर कोपरगाव रस्त्यावर अपघात होऊन मुजीब खान यांचे निधन झाले आहे.या रस्त्याला दर आठ दिवसाला एक घटना घडून अपघातांचे बळी नागरिक ठरत आहे. या रस्त्यासाठी अनेकदा टोकाचे आंदोलन करून शासनाला जाग आणून काम सुरू झाले होते मात्र गेले कित्येक महिने हे काम काही कारणाने अतिशय धीम्या गतीने होत असल्याने निष्पाप नागरिक हकनाक बळी ठरत आहे हे दुःखद आहे.हजारो कोटींचे फलक आणि शेजारी रक्ताच्या थारोळ्यात मायबाप जनता पडू लागली आहे हे खेदजनक आहे. शेकडो अपघात होऊन अनेकांना अवयव गमवावे लागले आहेत तर अनेक कुटुंबातील प्रमुख व्यक्ती अपघातात मृत झाल्याने त्यांचे कुटूंब दुःखात होरपळले आहेत अशी प्रतिक्रिया कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी दिली आहे.
वास्तविक पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांनी यासाठी निधी दिला असून त्याचा विनियोग स्थानिक यंत्रणेने लवकर का होऊ दिला नाही व संथ गतीने काम झाल्याने जाणारे बळी कधी थांबणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.फलकासाठी श्रेय आणि जाहिराती यासाठी विलंब करून नागरिकांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे प्रकार अनेकदा बघायला मिळतात मात्र या झळा सर्वसामान्य जनतेला रोज बसतात. या रस्त्याचा दैनंदिन वापर करावा लागत असल्याने पर्यायी मार्ग देखील नाही त्यामुळे होणार्‍या त्रासाला नागरिक कंटाळले आहे. तुकड्या तुकड्यात सुरू असलेले काम प्रलंबित ठिकाणी असलेली अफाट धूळ यामुळे नोकरदार, विद्यार्थी यांची वर्दळ असणारा हा महामार्ग श्‍वसनाच्या आजारांचा सापळा बनला आहे का अशी स्थिती आहे. अवजड वाहतूक आणि लहान वाहने यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवर असणारे नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात असे चित्र आहे. के जे सोमैय्या, एस एस जी एम या महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करतात त्यांना अशा हलगर्जी व्यवस्थेचा त्रास रोज सहन करावा लागतो आहे अशी प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे

COMMENTS