Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कष्टप्रद जीवन हा रयतच्या शिक्षकांचा स्थायीभाव : नवनाथ बोडखे        

श्रीरामपूर : रयत शिक्षण संस्था त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. श्रम, बौद्धिकता आणि मूल्यसंस्कार हा रयतच्या शिक्षकांचा मूलभूत गुण असून क

बंगालमध्ये भाजपला झटका म्हणजे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? पहा ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | LokNews24
राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा , 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध | Lok News24
स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी – नगरसेवक डॉ.सागर बोरुडे

श्रीरामपूर : रयत शिक्षण संस्था त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. श्रम, बौद्धिकता आणि मूल्यसंस्कार हा रयतच्या शिक्षकांचा मूलभूत गुण असून कष्टप्रद जीवन जगणे हा रयतच्या शिक्षकांचा स्थायीभाव आहे, असे प्रतिपादन उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी केले. प्रवरानगर येथील महात्मा गांधी संकुलातील कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सिंधू क्षेत्रे यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे हे उपस्थित होते. सुरुवातीला प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य अंगद काकडे यांनी केले. यावेळी विजयश्री कदम, प्राजक्ता रामफळे, स्नेहल रामफळे, जालिंदर रामफळे, गोरक्षनाथ रामफळे, जयश्री उंडे, विस्तार अधिकारी विष्णू कांबळे, माजी प्राचार्य आण्णासाहेब साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे व गोरक्षनाथ रामफळे यांचा प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते तर रयत बँक शाखा श्रीरामपूर यांच्या वतीने चांदीचे नाणे देऊन शाखाधिकारी भुजबळ यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. प्रमुख पाहुणे नवनाथ बोडखे यांनी श्रीमती सिंधू क्षेत्रे यांच्या कार्य आणि गुणांविषयी कौतुक केले. अध्यक्षीय भाषणातून रावसाहेब म्हस्के यांनी श्रीमती क्षेत्रे यांच्या कौटुंबिक गुणांचा आदर्श आणि संस्काराविषयी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी रतिलाल भंडारी, चंदूभाई तांबोळी, संपत जाधव, गणेश भांड, निलेश कराळे, गोरक्षनाथ घोरपडे, बाबासाहेब क्षेत्रे, दादासाहेब पठारे, गणेश चेचरे, उपप्राचार्य अलका आहेर, सुभाष भुसाळ, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह अशोकनगर व प्रवरानगर संकुलातील शिक्षक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट, रेणुका वर्पे, संगीता उगले व अश्‍विनी सोहोनी यांनी केले तर शेवटी प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS