Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांच्या कर्तव्यशून्यतेमुळे कोपरगावात अराजकता

गुन्हेगारीच्या चक्रव्यूहाला पोलिस प्रशासन जबाबदार असल्याची चर्चा

कोपरगाव ः गोदावरी नदीचा पवित्र तीर उजव्या डाव्या कालव्यामुळे बर्‍यापैकी ओलिताखाली असलेल्या क्षेत्रामुळे साखर उद्योगाची असलेली भरभराट आणि आर्थिक स

कर्जतमध्ये कवयित्री स्वाती पाटील यांनी केला पत्रकारांचा सत्कार
सकारात्मक दृष्टिकोनाने यशाची उंची गाठता येते – न्यायाधीश रेवती बागडे 
बहिरवाडीत झाडे लावून अस्थी व रक्षा विसर्जन

कोपरगाव ः गोदावरी नदीचा पवित्र तीर उजव्या डाव्या कालव्यामुळे बर्‍यापैकी ओलिताखाली असलेल्या क्षेत्रामुळे साखर उद्योगाची असलेली भरभराट आणि आर्थिक सुबत्ता. त्याचबरोबर धार्मिकतेच्या दृष्टीने शुक्लेश्‍वर मंदीर, साईबाबांची तपोभूमी, संत जनार्दन स्वामींचे समाधीस्थळ, ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेला तालुका म्हणून ओळख असणारे शहर सध्या गुन्हेगारीचा सामना करण्याच्या चक्रव्यूहात अडकले आहे. नकळत या गुन्हेगारीच्या चक्रव्यूहाला पोलिस प्रशासनच जबाबदार असल्याची चर्चा खुलेआम बोलुन दाखवली जात असल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात खाकी वर्दीबद्दल साशंकता निर्माण होणे साहजिकच असून, तालुक्यातील अराजकता, बिघडलेली कायदा सुव्यवस्थेला बघून खाकी वर्दिचा अंमल नेमका कशामुळे  कमी झाला याची खंत नागरिकांना वाटत आहे.

      ’सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत.मात्र सध्या कोपरगाव तालुक्यातील परिस्थितीचा मागोवा घेतल्यास हे ब्रीद वाक्य कुठेतरी पुसत चालले की काय ? याची जाणीव होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना जीव मुठीत धरुन जगण्याची नामुष्की ओढावली आहे. कोपरगाव तालुक्याला एक शहरी आणि एक ग्रामीण अशी दोन पोलिस स्टेशन अस्तित्वात आहे.मात्र ग्रामीण भागात आणि शहरी परिसरात पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादामुळे अनेक प्रकारचे अवैध व्यवसाय जोमात सुरु आहे. बिंगो लॉटरी, मटका, दारु, जुगार, गुटखा अवैधपणे राजरोजसपणे सुरु असल्यामुळे पोलिस प्रशासनाची कर्तव्यशून्यता दिसत होती मात्र गोळीबार प्रकरणामुळे ती चांगलीच अधोरेखीत झाली आहे. 9 जुलैला दाखल असलेल्या फिर्यादीत गुन्हेगारांना खाकीचा दणका दाखविला असता तर कदाचित पोलिस स्टेशन नजिक गोळीबाराची घटना टळली असती. स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला आणि केजेएस कॉलेजकडून येणार्‍या विद्यार्थींनी दिवाळीची फटाके फोडावी तशा गोळीबाराच्या कर्णकर्कश आवाजाने त्या भयभीत झाल्या. नशीब यात निअपराध तरुणीचा किंवा महिलेचा बळी गेला नाही.अर्थपूर्ण तडजोडी सर्ववसामान्यांच्या जीवावर बेतु नये या दृष्टीने कायद्याचे रक्षकांनी पाऊले उचलावी ही माफक अपेक्षा जनतेतून उमटत आहे.

    कोपरगावला झालेल्या गोळीबाराच्या मुळाशी महसुल विभागातील रेशनमधील गैरव्यवहार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आले असुन रेशनमध्ये चालू असलेला काळाबाजार काही नवीन  नाही. पॉसमशीन येऊनही ग्राहकांना हक्काचे धान्य न देणे, वेळेचे, दैनंदिन वाटपाचे बंधन ठेऊन धान्य चोरणे आणि आपली आणि अधिकार्‍यांची खिसे भरवण्याचा उद्योग तालुक्यात जोमाने सुरु आहे. महसुल आणि पोलिस प्रशासन भ्रष्टाचारासाठी एकाच नाण्याच्या दोन बाजु असल्यामुळे इथे स्वस्त धान्यच नाहीतर वाळु तस्करीही राजरोसपणे सुरु आहे. मात्र गतकाळात याबाबत पोलिस प्रशासन आणि महसुल विभाग अनभिज्ञ असल्याचे निव्वळ सोंग करत आले आहे सद्यस्थितीला तिच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. दोनही विभागांनी आठ दिवस कंबर कसली तर तालुक्यातुन अवैध व्यवसायाचे उच्चाटन झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. पोलिस स्टेशनमध्ये सज्जन नागरीकांना चढ्या आवाजात तर गुन्हेगारांना आदबीने वागणूक मिळत असल्याचा अनुभव अनेकांना आहे. त्या वर्तणूकीत आतातरी बदल व्हायला हवा.

पोलिसांचा दरारा का बरे कमी झाला ? – महापुरुषांच्या जयंती आणि राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी कोपरगाव शहरात खुलेआम दारुची विक्री व्हावी, गुन्हेगारांनी सहाय्यक फौजदारावर हात उचलवा इतकी हिंमत गुन्हेगारांत कशामुळे आली याचे उत्तर पोलिस प्रशासनाने जनतेला देण्याची गरज आहे.जर खाकीतील अधिकारी वर्गावर गुन्हेगार चाल करणार असतील आणि दिवसाढवळ्या टिकल्या फोडल्यागत वर्दळीच्या रस्त्यावर शहरात गावठी कट्ट्याने गोळीबार होणार असतील तर सर्वसामान्य माणसाने ,शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शहरात निर्भयपणे संचार करायचा की नाही, जगायचे तरी कशे ? असा प्रश्‍न सध्या कोपरगावच्या नागरीकांना पडला आहे.पोलिसांनी गणेशोत्सव शांततेत पार पडला आता दिपावली पर्यंत सण उत्सव निर्भयपणे साजरे करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी कंबर कसणे तितकेच गरजेचे आहे.

COMMENTS