Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फायनान्स कंपनीच्या विरोधात आज आझाद मैदानावर उपोषण

शहरटाकळी ः फायनान्स कंपनीचा मनमानी कारभाराविरोधात कर्जदारांनी एकत्र येऊन शेवगाव तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना विद्याताई गाडेकर यांच्या नेतृत्वा

टीईटी पेपरफुटीचे संगमनेर कनेक्शन चर्चेत
६५ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप
आमदार काळेंकडून कोपरगाव शहराच्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी

शहरटाकळी ः फायनान्स कंपनीचा मनमानी कारभाराविरोधात कर्जदारांनी एकत्र येऊन शेवगाव तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना विद्याताई गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले असून सोमवार 23 सप्टेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसणार असल्याचे कर्जदारांनी निवेदनात म्हटले आहे,
संबंधित विभागांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फायनान्स कंपन्याकडून कर्जाची घेतलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम भरूनही त्यापेक्षा अधिक रक्कम फायनान्स कंपन्या कर्जदारांच्या माथी मारत आहेत, खाजगी कंपनीने नेमलेलें वसुली अधिकारी जुलमी पद्धतीने वसुलीचा तगादा लावत आहेत, तुमचे घर खाली करा तुमच्या घराचा निलाव झाला आहे, असे सांगून घर जप्ती करण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत असून अमानुष पद्धतीच्या या वागणुकीमुळे कर्जदारावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तरीही या सर्व अमानुष जाताला कंटाळून आम्ही फायनान्स कंपनीचे सर्व कर्जदार नागरिक आझाद मैदान मंत्रालय मुंबई या ठिकाणी सोमवार 23 सप्टेंबरपासून उपोषणास बसणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे, निवेदनावर राम गवळी, अरुण वैद्य, जालिंदर चेडे, प्रवीण बरबडे, कैलास राजळे, हरिभाऊ राजळे, दिलीप राजळे, गणेश वाकले, निवृत्ती फुलट, मयूर धानके, अक्षय खोमणे, अशोक पुरी, सतीश पवार, शिवाजी कावले आदी सह शेकडो कर्जदारांच्या सह्या आहेत.

कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वसूली – एस्पायर होम फायनान्स कंपनीचे ओसवाल होम फायनान्स कंपनीमध्ये विलीनीकरण झाले असून कर्जाची रक्कम कर्जदार कडून अव्वाच्या सव्वा वसूल केली जात आहे त्यामुळे कर्जदारांनी जन आंदोलन हाती घेतले आहे.

COMMENTS