Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी भातकुडगाव फाट्यावर उपोषण

पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

शेवगाव तालुका ः शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर कामधेनू पतसंस्थेच्या समोरील प्रांगणात मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नांवर चंद्रका

मराठा समाजाचे साखळी उपोषण 25 दिवसांनंतर स्थगित
मराठा आरक्षणासाठी धावपळ सुरू
संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

शेवगाव तालुका ः शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर कामधेनू पतसंस्थेच्या समोरील प्रांगणात मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नांवर चंद्रकांत महाराज लबडे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, प्रहार जनशक्तीचे तालुकाप्रमुख रामजी शिदोरे, जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे उपोषणास बसले आहेत. शनिवारी पहिल्याच दिवशी शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आरोग्य तपासणी संदर्भात आरोग्य विभागाला कळवले असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. त्यांच्या समवेत शेवगाव पोलीस स्टेशनचे बप्पासाहेब धाकतोडे, किशोर पालवे, भातकुडगाव सर्कलचे परसराम नाकाडे उपस्थित होते.
अखंड मराठा समाज शेवगाव तालुक्याच्या वतीने मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला व संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ राज्यात अनेक ठिकाणी मराठा सेवक वेगवेगळ्या मार्गाने निषेध नोंद आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणीही उपोषणास सुरुवात केली असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.जरांगे पाटील यांनी मांडलेल्या सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैद्राबाद गॅझेट लागू करावे, सातारा गॅझेट लागू करावे,बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे,मराठा बांधवांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत या मागण्या रास्त असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय मराठा सेवकांनी ही घेतला आहे.यावेळी कामधेनुचे चेअरमन बाळासाहेब काळे,शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले,अनिल मेरड,भाऊराव फटांगरे, पत्रकार शहाराम आगळे,तारामती दिवटे, मुसाभाई शेख,कानिफनाथ घाडगे,अण्णासाहेब शिंदे, गणेश शिंदे, सिद्धार्थ काटे, शितल पुरनाळे,ऋषिकेश भालसिंग, राजेंश लोढे, दीपक चेडे, योगेश जाधव, राम उगले, रवींद्र भालसिंग, हरिश्‍चंद्र जाधव यांच्यासह आदी नागरिक यावेळी उपस्थित होते.

COMMENTS