Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डाऊच खुर्द साठवण तलाव एमएसआरडीसीकडून हस्तांतरित व्हावा

ग्रामपंचायतीच्या वतीने मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातून समृद्धीचे महामार्गाचे काम सुरू असताना डाऊच खुर्द येथील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव या महामार्गात बाधित झा

खा. विखेंना भोवणार अखेर ते इंजेक्शन?…
BREAKING: अंत्यविधीसाठी शंभरावर लोकांची उपस्थिती, नातेवाईक मृताचे पाय धुवून पाणीही प्यायले|LokNews24
बँक बचावची आश्‍चर्यकारक माघार, सहकार वर्चस्वाच्या दिशेने…

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातून समृद्धीचे महामार्गाचे काम सुरू असताना डाऊच खुर्द येथील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव या महामार्गात बाधित झाला होता. एम एस आर डी सी कडून बाधित झालेला तलाव दुसरीकडे पुन्हा निर्माण करण्यात आला. साडेतीन एकरावर नव्याने तलावाचे काम पूर्ण झाले असून डाऊच खुर्द गावाला पाणीपुरवठा देखील सुरू आहे. मात्र ग्रामपंचायतीकडे अजून रस्ते विकास महामंडळाने हा पाणीपुरवठ्याचा तलाव हस्तांतरित केलेला नाही. तो लवकरात लवकर हस्तांतरित होण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे व शिवसेना तालुकाप्रमुख संजय गुरसळ यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहे.
समृद्धी महामार्गात हा तलाव बाधित झाल्यानंतर तत्कालीन सरपंच संजय गुरसळ यांनी माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयापर्यंत नव्याने तलाव पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. गावच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने याची दखल घेत दुसरीकडे जागा खरेदी करून तीन ते साडेतीन एकरावर नव्याने पाण्याचा तलाव निर्माण केला. काँक्रिटीकरणासह कंपाउंड व इतर सर्व बाबी त्यांनी पूर्ण केल्या. आज रोजी गावाला याच तळ्यातून पाणीपुरवठा देखील केला जात आहे. मात्र भविष्यात या तळ्यावर अजूनही काही विकासात्मक काम करायचे असेल तर हे तळे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित व्हायला पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी या तळ्यासंदर्भात आढावा घेत लवकरात लवकर साठवण तलाव हा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केला जाईल असे आश्‍वासन दिले.

COMMENTS