Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यातील श्री विवेकानंद विद्यामंदिरने मारली बाजी

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक

पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या विद्यालयाने 2024-25 या वर्षात मुख्यमंत्री मा

नगरचे रस्ते विकासाला डांबर दरवाढीची खीळ
खोपडीतील शेतकर्‍यांना 18 वर्षांनंतर मिळाला जमिनीचा मोबदला  
गोवा बनावटीच्या दारूसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त व एकास अटक! l LokNews24

पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या विद्यालयाने 2024-25 या वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभाग घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.  वर्षभराच्या कार्यकाळात विविध शैक्षणिक उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सोयी- सुविधा उपलब्ध करून शैक्षणिक क्षेत्रात अव्वल मानांकन प्राप्त केले आहे. शाळेला प्रथम क्रमांकाचे तीन लाख रुपयाचे बक्षीस राज्य शासनाकडून काही दिवसात लवकरच प्राप्त होणार आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुसज्ज इमारत, पक्के कंपाऊंड, निसर्गरम्य परिसर,भव्य क्रीडांगण,आकर्षक चित्रासह रंगरंगोटी,डिजिटल स्मार्ट बोर्ड, स्पर्धा परीक्षा जादा तासिका नियोजन, ग्रंथालय, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रयोगशाळा, पिण्याचे आरोयुक्त पाणी,शा.पो. आ. अंतर्गत परसबाग, विद्यार्थी सुरक्षा योजना व विद्यार्थी लाभाच्या योजना, कृतीयुक्त व आनंददायी अध्ययन अध्यापन पद्धत इत्यादी सुविधा विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण व उत्कृष्ट बाबी केंद्रस्तरीय, तालुका स्तरीय, जिल्हास्तरीय तपासणी पथकांना आढळून आलेल्या आहेत.विद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून तपासणी पथक प्रमुख उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, अधिव्याख्याता मुकुंद दहिफळे, शिक्षण विस्ताराधिकारी शैलेजा राऊळ व बी.के. साठे या अधिकारी वर्गांनी विशेष कौतुक करून समाधान व्यक्त केले. विद्यार्थी व शाळा दोन्ही केंद्रबिंद ठेवून विविध शैक्षणिक उपक्रम राबवीत गुणवत्ता वाढीबरोबर सोयीसुविधा पुरवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.त्यामुळेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात शाळेला हा मान प्राप्त झालेला आहे. हा बहुमान मिळवण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.संस्थेच्या व विद्यालयाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व भौतिक सुविधा यापुढेही वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी दिली. शाळेचे क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य,विविध स्पर्धा परीक्षा मधील यश – गुणवत्ता तसेच सांस्कृतिक क्षेत्रात असलेले योगदान या शाळेच्या उल्लेखनीय बाबीमुळे या स्पर्धेत विद्यालयास यश प्राप्त झाले आहे.शाळेने जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे या संदर्भात विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद मेढे यांनी माहिती दिली.या उपक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.

COMMENTS