Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोंढवड येथे पशुवैद्यकीय दवाखाना स्थापनेची क्रांतीसेनेची मागणी

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील कोंढवड व आसपासच्या परिसरातील पशुपालक शेतकरी हे अल्पभूधारक व शेतमजुर असून ते शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवस

अंबादास झावरे यांचे निधन
*सिरम नंतर आता ‘हा’ लस उत्पादक पुण्यात दाखल | सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24*
नागवडे कारखान्याची बदनामी थांबवा.. आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील कोंढवड व आसपासच्या परिसरातील पशुपालक शेतकरी हे अल्पभूधारक व शेतमजुर असून ते शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा महत्वाचा व्यवसाय करतात. येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची सोय नसल्याने शेतकर्‍यांना आजारी जनावरांवर उपचार करण्यात अनंत अडचणी निर्माण होत असल्याने अहमदनगर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांच्याकडे पशुवैद्यकीय दवाखाना स्थापनेची मागणी शेतकर्‍यांच्या वतीने क्रांतीसेनेकडून करण्यात आली आहे.
                निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या काळात शेतीपुरक असलेल्या दुग्ध व्यवसायातून शेतकर्‍यांच्या हाती चार पैसे येत होते. मात्र, सध्या पशुपालक शेतकर्‍यांना म्हणावा तसा दुधाला दर मिळत नसल्याने पशुंच्या आहारावर तसेच खासगी डॉक्टरांकडून करण्यात येणार्‍या उपचारांमुळे खर्चात ताळमेळ बसत नसल्याने पशुपालक शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. कोंढवड व आसपासच्या परिसरातील शेतकरी दुग्धव्यवसाय या जोडधंद्यावर अवलंबून असल्याने या भागात जनावरांवरील उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची अत्यंत आवश्यता असल्याने कोंढवड येथे तात्काळ पशुवैद्यकीय दवाखाना स्थापनेसाठी परवानगी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कोंढवडचे उपसरपंच इंद्रभान म्हसे, क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, सुरेश म्हसे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शिवाजीराव औटी, क्रांतीसेना तालुकाध्यक्ष संदीप उंडे, भिमराज माळवदे, कैलास म्हसे, पत्रकार बंडू म्हसे, दिलीप म्हसे, जनार्दन म्हसे, विष्णू म्हसे, माजी उपसरपंच विजय म्हसे, दत्तात्रय म्हसे, बाळासाहेब म्हसे, शंकर औटी आदींसह पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पशुसंवर्धन मंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.

COMMENTS