Homeताज्या बातम्यादेश

राष्ट्रपती मुर्मू यांनी केले 8 व्या भारत जल सप्ताहाचे उद्घाटन

नवी दिल्ली ः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी मंगळवारी नवी दिल्ली इथे 8व्या भारत जल सप्ताहाचे उद्घाटन केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्ह

आणीबाणी हा देशातील काळा अध्याय ः राष्ट्रपती मुर्मू
राष्ट्रपती मुर्मू यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
लेखक समाजाचे दक्ष पहारेकरी असतात ः राष्ट्रपती मुर्मू

नवी दिल्ली ः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी मंगळवारी नवी दिल्ली इथे 8व्या भारत जल सप्ताहाचे उद्घाटन केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की पाणीटंचाई झेलणार्‍या लोकांची संख्या त्यांना पुरेसा पाणी पुरवठा करून कमी करण्याचे ध्येय अखंड मानवतेसाठी अत्युच्च महत्त्वाचे आहे. शाश्‍वत विकासाच्या ध्येयांमध्ये स्थानिक समुदायांच्या सहभागाने पाणी आणि स्वच्छता व्यवस्थापनाला पाठिंबा देऊन ते बळकट करण्यावर भर दिलेला आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की प्रत्येकाला पाणी पुरवण्यासाठी व्यवस्था करणे आपल्या देशाच्या प्राधान्यक्रमावर प्राचीन काळापासून आहे. लदाखपासून केरळपर्यंत जल संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या परिणामकारक व्यवस्था आपल्या देशात अस्तित्वात होत्या. ब्रिटिश काळात या व्यवस्था हळूहळू लोप पावल्या. आपल्या व्यवस्था निसर्गाशी जुळवून घेणार्‍या होत्या. आपल्या प्राचीन पाणी व्यवस्थापन व्यवस्थांवर संशोधन करून त्यांचा आधुनिक संदर्भ लक्षात घेऊन व्यावहारिक वापर व्हायला हवा. राष्ट्रपतींनी सांगितले की विहिरी, तळी यांसारखे जलस्रोत आपल्या समाजात शेकडो वर्षांपासून पाण्याच्या बँका असल्यासारखे होते.आपण बँकेत पैसे ठेवतो आणि वापरासाठी हवे असल्यास ते आपल्याला बँकेतून काढून घ्यावे लागतात. तसेच पाण्याचे आहे. लोक आधी पाणी साठवत आणि त्यानंतरच त्यांना ते वापरासाठी उपलब्ध होत असे. पैशाचा अपव्यय करणारे लोक समृद्धीकडून दारिद्र्याकडे जातात. तसेच, पाणीटंचाई ही पावसाचे प्रमाण भरपूर असलेल्या प्रदेशांमध्येही दिसून येते. मर्यादित अर्थार्जन करून पैसा हुशारीने वापरणारे लोक त्यांच्या जीवनात उद्भवणार्‍या आर्थिक अडचणीचा यशस्वीरित्या सामना करतात. तसेच, कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात जलसंचय करू शकणारी गावे पाणीटंचाईच्या काळात सुरक्षित राहतात.राजस्थान आणि गुजरातेतील अनेक भागांत जलसंचयाच्या परिणामकारक पद्धती आत्मसात करून आपल्या प्रयत्नांनी लोकांनी पाणीटंचाईवर मात केली. 

COMMENTS