Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात गणेशोत्सवादरम्यान 16 भक्तांचा मृत्यू

धुळ्यात मिरवणुकीत टॅक्टर खाली येवून तीन बालकांचा मृत्यू

मुंबई/पुणे ः राज्यात मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जात असतांना विविध घटनेत तब्बल 16 गणेशभक्तांचा मृत्यूू झाला आहे. कुठे बाप्पांचे व

यंदाच्या गणेशोत्सवावर…राष्ट्रवादीचा वरचष्मा ?
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज
पुण्यातील गणेशोत्सवावर 1800 ‘सीसीटीव्ही’ कॅमर्‍यांची नजर

मुंबई/पुणे ः राज्यात मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जात असतांना विविध घटनेत तब्बल 16 गणेशभक्तांचा मृत्यूू झाला आहे. कुठे बाप्पांचे विसर्जन करतांना बुडून मृत्यू झाला आहे, तर धुळ्यात विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने 3 बालक ठार झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा घाणेगाव येथील तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अभय सुधाकर गावंडे असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
धुळे शहरापासून जवळ असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर खाली आल्याने तीन बालके जागीच ठार झाली. परी बागुल, शेरा सोनवणे, लड्डू पवार अशी त्यांची नावे आहेत. विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवरील चालक बदलताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची स्थिती गंभीर आहे. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. गणपती उत्सवाला धुळ्यात गालबोट लागले असून एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. गणपती बुडवण्यासाठी गेले असता तलावाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या दोघेही भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह आणखी एक मित्र विसर्जनासाठी गेला होता परंतु तो मात्र सुदैवाने बचावला आहे. नाशिकमध्ये गणपती विसर्जन सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन तरुणांचा वालदेवी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. विरारमध्ये गणपती विसर्जन करताना गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे. गणपती विसर्जन करताना पाण्यात तरुणाला फिट येऊन तो पाण्यात बुडाला. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील इसापूर येथे गणपती विसर्जनावेळी दोघे पूर्णा नगर नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. दर्यापूर तालुक्यांतील दारापूर येथील गणपती विसर्जनात एक जण बुडाला. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग येथील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनावेळी 16 वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. गणेश गायकवाड असे मृत मुलाचे नाव आहे. गणेश हा अकोला शहरातील अकोट फैल भागातील रहिवासी आहे. सायंकाळी गणेश हा आईसोबत घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यासाठी म्हैसांग येथे पूर्णा नदीवर गेला होता. गणेश विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. आईच्या आकांताने तातडीने विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्याला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अहमदनगरमध्ये गणपती विसर्जना दरम्यान 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव इथे ही घटना घडली आहे. गणपती विसर्जन करताना चंद्रभागा नदीत एक जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS