Homeताज्या बातम्यादेश

कोलकात्यात कनिष्ठ डॉक्टरांचा संप सुरूच

कोलकाता ः पश्‍चिम बंगालमध्ये कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्टच्या रात्री प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार हत्येच्या विरोध

संजय राऊत तुमची बेसूर पिपाणी बंद करा.
शिवसेनेकडून महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांचा अर्ज दाखल l पहा LokNews24
5 भारतीयांसह 72 प्रवाशांचा मृत्यू

कोलकाता ः पश्‍चिम बंगालमध्ये कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्टच्या रात्री प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार हत्येच्या विरोधात कनिष्ठ डॉक्टरांचे निदर्शने शुक्रवारी देखील सुरूच आहेत. गुरूवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आंदोलक डॉक्टरांमध्ये चर्चा होणार होती, मात्र या आंदोलक डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे टाळले आहे. तिसरा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर ममतांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, सरकारशी चर्चा होऊ न शकल्याने दु:ख होत असल्याचे कनिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. पण त्यांना ममता बॅनर्जींचा राजीनामा नको आहे. ते अजूनही चर्चेसाठी तयार आहेत. या संपूर्ण घटनेनंतर बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी एक व्हिडिओ जारी केला. ते म्हणाले की, ममता बंगालच्या लेडी मॅकबेथ आहेत. त्या प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणार आहे.

COMMENTS