कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने दिल्या ५ कोटी लस मात्रा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने दिल्या ५ कोटी लस मात्रा

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज सायंकाळी सहापर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण ड

जय भीम ब्रिगेडचे धरणे आंदोलनाला यश
रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 11 मृत्यू ; भांडुप येथील घटनेप्रकरणी तज्ज्ञ समितीचा ठपका
पोलिस महासंचालकांचे बनावट फेसबुक अकाऊंट बनवणारा अटकेत

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज सायंकाळी सहापर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली आहे. देशभऱात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. १४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री उशिरापर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली.

COMMENTS