Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपाइंला मिळावी : कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची मागणी

अकोले :अकोले तालुका रिपब्लिकन पक्षाची बैठक रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहाव

विकास थांबवणारा तुमचा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही ः डॉ. सुजय विखे
बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय : जगन्नाथ महाराज शास्त्री
ऑक्सिजन संपल्याने डॉक्टर हतबल ; खासगी रुग्णालये व्हेंटिलेटरवर
श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी , अकोलेच्या बैठकीत  एकमुखी मागणी | Punya Warta

अकोले :अकोले तालुका रिपब्लिकन पक्षाची बैठक रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी अशी मागणी करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश संघटक रमेश शिरकांडे हे होते. अहमदनगर जिल्हा हा कायमच रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र हेतुपुरस्सर रिपब्लिकन पक्षाला डावलण्यात आलेले आहे. तरी देखील युतीचा धर्म पाळण्याचे काम रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे. मात्र येणार्‍या काळात श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी ही एकमुखी मागणी करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाला ही जागा मिळाली नाही तर अहमदनगर जिल्ह्यात कुठेही युतीचे काम न करण्याची शपथ घेण्यात आली.
रिपब्लिकन पक्षाची युती ही भाजपा बरोबर आहे. मित्र पक्षाने रिपब्लिकन पक्षाचा योग्य सन्मान राखावा. अकोले विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने देखील एक ऑक्टोबर ला निर्णय घेणार असल्याचे विजयराव वाकचौरे यांनी जाहीर केले आहे. तो पर्यंत कुठल्याही उमेदवाराचे समर्थन करणार नसल्याने वाकचौरे यांनी सांगितले आहे. मात्र येणार्‍या काळात शासकीय योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहोजे, असे देखील वाकचौरे यांनी सूचित केले. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाची अकोले तालुका कार्यकारणी पुनर्गठित करण्यात आली. त्यामध्ये विजय पवार यांची युवक आघाडी च्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर कैलास संगारे व रमेश वाकचौरे यांची तालुका उपाध्यपदी तर किशोर शिंदे यांची तालुका कार्याध्यक्षपदी रोहिदास साळवे यांची मातंग समाज आधाडीच्या तालुकाध्यक्ष पदी तसेच अतिरिक्त जबाबदारी म्हणून जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे. तसेच गणेश साळवे यांची जिल्हा संघटकपदी सचिन कदम यांची युक आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी गुणरत्न साळवे यांची मुळा विभाग संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. शाम गायकवाड यांची संघटन सरचिटणीसपदी राहुल चिकने यांची तालुका संघटकपदी प्रमोद गायकवाड यांची तालुका संघटक पदी कैलास नेपाळे यांची युवक आघाडीच्या प्रमुख संघटक पदी प्रभाकर वाघमारे यांची प्रमुख संघटकपदी उत्तम आढाव यांची सह सरचिटणीस पदी पोपट कांबळे यांची तालुका संघटक पदी निवड करण्यात आली आहे. सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांच्या निवडीची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केली. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष सावळेराम गायकवाड, जिल्हा संघटक प्रदीप आढाव, कमलेश कसबे, विठ्ठल खरात, पास्टर गोदोन कर्णिक, आदींनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीस हरिचन्द्र गोडसे, भाऊसाहेब सिरसागर, सूर्यकांत जगताप, रामचंद्र तपासे, विजय गायकवाड, सचिन खरात, शंकर संगारे, साहिल मोहिते, शंकर वायाळ, अमर जाधव, युवराज येडे, थोरात जी. आर. काशिनाथ घोटकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS