Homeताज्या बातम्यादेश

हरियाणातील राजकीय दंगल !

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. या निवडणुकी चांगल्याच रंगणार असल्याचे चिन्हे दिसून येत आ

नवे शिक्षण धोरण
मराठी फलकांचा मुद्दा ऐरणीवर
शेतकर्‍यांची कोंडी


हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. या निवडणुकी चांगल्याच रंगणार असल्याचे चिन्हे दिसून येत आहे. कारण दोन्ही राज्यात भाजपची चांगलीच कसोटी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे हरियाणा राज्यात मातब्बत शेतकरी आहेत. एका-एका शेतकर्‍यांकडे मोठ्याप्रमाणावर शेती आहे. आणि इथले शेतकरी प्रस्थापित असून, आपल्या न्याय हक्कांप्र ती ते जागरूक आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या राज्यातील शेतकर्‍यांनी शंभू सीमेवर ठाण मांडून ठेवले आहे. त्यातच विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँगे्रसमध्ये दाखल होत या राजकीय दंगलमध्ये रंग भरले आहेत. खरंतर विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपद जिंकणार यात शंका नव्हती, मात्र ऐनवेळी तिचे वजन वाढल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. तिला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर भारतात एक तीव्र संतापाची लाट होती. एका दिवसांत तीन कुस्तीपटूंना चीतपट केलेल्या विनेशला अवध्या 100 ग्रॅम वजनासाठी अपात्र ठरवण्यात आले. बरं तिला दुसर्‍या क्रमाकांचे रौप्यपदकही दिले नाही. त्यामुळे तिच्याप्रती एक सहानुभूतीची लाट होती. शिवाय तिने काँगे्रसमध्ये प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक कठीण जाणार असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये देखील निवडणूक होत आहे. एका दशकानंतर तर कलम 370 हटवून 5 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर ही निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे भाजपने कलम 370 हटवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे भारताला सम-समान पातळीवर आणता आले. असे असतांना त्याचा भाजपला कितपत फायदा होतो, याचे उत्तर निकालातूनच ठरणार आहे. खरंतर काश्मीर खोर्‍यात अजूनही दहशतवादी कारवाया सुरूच आहे. शिवाय काश्मीर खोर्‍यात भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही, हे दिसून येत आहे. मात्र जम्मू खोर्‍यात आपली राजकीय ताकद प्रस्थापित करण्यासाठी भाजप पूर्ण ताकद पणाला लावतांना दिसून येत आहे. खरंतर कलम 370 रद्द केल्यानंतर देखील या प्रांतात हिंसाचार, दहशतवाद कमी झालेला नाही. शिवाय बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे या प्रांताचे भवितव्य निवडणुकीनंतरच ठरणार असल्याचे दिसून येत आहे. हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे, या प्रांतात भाजपची सत्ता आल्यास या प्रदेशाला राज्याचा लवकरच दर्जा मिळू शकतो. आणि जर दुसर्‍या पक्षाची सत्ता आल्यास भाजप केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायम ठेवून आपल्या केंद्रीय सत्तेचा अंमल कायम ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा आलेख कायमच घसरता राहिलेला आहे. अशावेळी विविध राज्यात निवडणुका होतांना दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला एक-एक राज्य आपल्याकडे खेचून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने एका दशकानंतर लोकसभेत 99 खासदार निवडून आणले आहे. शिवाय काँगे्रसमध्ये इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे एकीकडे भाजपविरोधात रोष वाढतांना दिसून येत आहे. हरियाणातील शेतकरी तब्बल 200 दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून शंभू सीमेवर ठाण मांडून आहे. त्यामुळे केंद्र सरकारला शेतकरी आंदोलनाची दखल घेवून शेतकरी रोष कमी करण्याची गरज आहे. मात्र त्यात केंद्र कमी पडतांना दिसून येत आहे. खरंतर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची कृषीमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे, त्यामुळे शेतीसंबंधित समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेतील आणि नाविन्यपूर्ण योजना आणून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासोबत शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे, मात्र त्या अपेक्षा पूर्ण होईल की नाही, याचे उत्तर आगामी काळच देईल. मात्र त्यासाठी जनतेच्या भावना या मतपेटीतूनच कळतील, यात शंका नाही.

COMMENTS