Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडला भटके विमुक्त दिन उत्साहात

जामखेड ः अखिल भारतीय भटके विमुक्त घुमंतु आदिवासी महासंघाच्या वतीने 31 आँगस्ट रोजी जामखेड येथे अखिल भारतीय भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला. याव

नगर कल्याण रोड वरुन २१ वर्षीय महिला बेपत्ता 
एकतर्फी प्रेमातून मुलीला ठेवले डांबून ; नगरच्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
राहुरी फॅक्टरीत महावितरण अधिकार्‍यास मारहाण

जामखेड ः अखिल भारतीय भटके विमुक्त घुमंतु आदिवासी महासंघाच्या वतीने 31 आँगस्ट रोजी जामखेड येथे अखिल भारतीय भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मार्गदर्शन व भटके विमुक्त मेळावा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली. संघटनेची भूमिका व जबाबदारी यावर सर्वांनी आपआपले मतं मांडली. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत कसा पोहचेल यावर विचार विनिमय करून जात प्रमाणपत्रासह विविध दाखला मिळण्यासाठी ज्या जाचक अटी आहेत यावर चर्चा झाली. येणार्‍या काळात जे शासन आपल्याला न्याय देईन व आपले हक्क जाणून घेईन त्याच उमेदवाराची निवड करायची व त्यास सर्वतोपरी मदत करायची यावर सविस्तर विचार मांडण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश धोत्रे, नगरसेवक मोहन पवार, संदीप गायकवाड, तालुकाध्यक्ष नवनाथ जाधव, शहराध्यक्ष मच्छिंद्र पवार, तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र येवले, शहर उपाध्यक्ष राजेंद्र शेलार, प्रमुख पाहुणे विकास मस्के, कार्यक्रमाचे अध्यक्ष समाधान आंबेडकर, ह.भ.प. अ‍ॅड. महारुद्र नागरगोजे, शंकर लोखंडे, सोनू परमाळ, अजिनाथ चव्हाण, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष नवनाथ मोतेकर, कर्जत तालुका अध्यक्ष हनुमंत म्हेत्रे, श्रीमती शीतल परमार, अभिमान खाडे, जयेश कांबळे, महेश डोळे, दिलीप जाधव, विजय धोत्रे, संजय पिटेकर, जगदिश जाधव, रोहन धोत्रे, अमोल जाधव, नाना जाधव, अण्णा विटकर, संजय विटकर व इतर सामाजिक कार्यकर्ते व बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोवर्धन जाधव यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचलन नवनाथ जाधव यांनी केले आभार नगरसेवक मोहन पवार यांनी मानले.

COMMENTS