Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये पुन्हा तणाव

इम्फाळ ः मणिपूरमधील तणाव अजूनही काही निवळण्याची शक्यता दिसून येत नाही. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुकी

संगमनेर शेतकी संघ राज्यात प्रथम क्रमांकाचा ः थोरात
योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक नोंदणी करणे आवश्यक- नंदकुमार गव्हाणे
“बटरफ्लाय” चित्रपटातलं ‘”कोरी कोरी झिंग हाय गं” गाणं प्रदर्शित

इम्फाळ ः मणिपूरमधील तणाव अजूनही काही निवळण्याची शक्यता दिसून येत नाही. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुकी समुदाय रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे. या क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह विधान असल्याचे म्हटले जात आहे. कुकी-जो समुदायाच्या लोकांनी आदिवासी बहुल भागात तीन रॅली काढल्या. या रॅलींमध्ये कुकी-जो समुदायाने वेगळ्या प्रशासनाची मागणी केली. तसेच, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा निषेध केला. या क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह विधान असल्याचे म्हटले जात आहे.
यादरम्यान, पोलिसांनी सांगितले की, शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता चुरचंदपूरमधील तुइबोंग उपविभागातील पेनिअल गावात भाजपचे प्रवक्ते मायकेल लामजाथांग यांच्या वडिलोपार्जित घराला अज्ञात हल्लेखोरांनी आग लावली. हल्ल्यादरम्यान घराच्या आवारात उभ्या असलेल्या एका कारलाही आग लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी एक्सवर लिहिले की, शांतता रॅलीच्या नावाखाली आपल्या लोकांना लक्ष्य करणे, ही एक गंभीर त्रासदायक प्रवृत्ती आहे. अशा चिथावणीखोर कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. संभाव्य धोक्याची पूर्वसूचना देऊनही पुरेशी सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल.

COMMENTS