Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवद्रोही सरकारला गेट आऊट करण्याची वेळ

उद्धव ठाकरे ः सत्ताधार्‍यांविरोधात मविआचा एल्गार ; पुतळा कोसळल्याप्रकरणी केले जोडे मारो आंदोलन

मुंबई ः छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर जोडे मारो आंदोलन केले. यावेळी

राणांना तिकीट दिल्यास बंड करू ः बच्चू कडू
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.
ढिगार्‍याखालील जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य

मुंबई ः छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर जोडे मारो आंदोलन केले. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकार बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी खडेबोल सुनावले. महायुतीने मोठी चूक केली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी माफी मागितली आहे. पण चुकीला माफी नाही, महायुतीचे सरकार शिवद्रोही असून, या शिवद्रोही सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया करण्याची वेळ आली असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून रविवारी सत्ताधार्‍यांविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चाचेही आयोजन केले होते. हा मोर्चा गेट वे वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार आदित्य  ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यासह अनेक नेते आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवद्रोह्यांना माफी नाही अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीला आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. यानंतरही विरोधक मोर्चे काढत आहेत. विरोधकांच्या निदर्शनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यटकांच्या ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपतींचा पुतळा कोसळला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली.

माफी मागितली नसती तर महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना सोडलेच नसते. माफी मागताना मोदींनी मग्रुरीने माफी मागितली असा आरोपच ठाकरे यांनी केला. अशी मग्रुरीने माफी मागणे आम्हाला मान्य नाही असेही ते म्हणाले. मोदी माफी मागत होते आणि त्याच व्यासपिठावर एक उपमुख्यमंत्री हसत होता, असा दावा ठाकरे यांनी केला. ऐवढी थट्टा तुम्ही करता का? असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मोदींनी माफी कसासाठी मागितली, पुतळा पडला म्हणून? पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचारा झाला म्हणून? की या सर्वांवर पांघरूण घालत आहात म्हणून? असा प्रश्‍नही ठाकरे यांनी यावेळी केला. पण माफी मागून काही उपयोग नाही. चुकीला माफी नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. जिथे जिथे मोदी हात लावत आहेत तिथे तिथे सत्यानाश होत आहे असेही ते म्हणाले.  

महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू ः नाना पटोले – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू आहे. कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार केला. महाराजांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले. मालवणमध्ये महाराजांची प्रतिमा पडली. ती फक्त महाराजांची प्रतिमा नव्हती, ती महाराष्ट्राचा धर्म आणि राज्याचा अवमान या सरकारने केला. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अवमान सरकारकडून झाला. महाराज आमचे दैवत आहेत, त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक झालो. देशातील शिवप्रेमींचा यांनी अवमान केला आहे. जनतेने पुतळा कोसळला त्यांच दिवशी महाराजांची माफी मागत असे शिवद्रोही सरकार पुन्हा येऊ देणार नाही, असा संकल्प केल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचारामुळेच पुतळा पडला ः खा. शरद पवार – खासदार शरद पवार म्हणाले की, वार्‍यामुळे पुतळा पडला, असे सांगितले जाते. गेटवेवर हा पुतळा 50 वर्षांपासून आहे. पण तो अजूनही टिकून आहे. राज्यातही असे अनेक पुतळे आहेत. मालवणमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे पुतळा पडला. हा शिवप्रेमींचा अपमान असून, महाराष्ट्राच्या अस्मितेशी हा खेळा सुरू असूून, भ्रष्टाचार्‍यांनी शिवाजी महाराजांना देखील सोडले नसल्याची कठोर टीका पवार यांनी या आंदोलनप्रसंगी केली.

COMMENTS