Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस.जी. विद्यालयाचे संस्थापक ठोळे यांची जयंती उत्साहात

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील प्रसिद्ध श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे संस्थापक कै. गोकुळचंदजी ठोळे यांचा 148 वा जयंती सोहळा  अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.

कोपरगावात शिवजन्मोत्सव उत्साहात होणार साजरा
आरोग्य सेवेने मनुष्य जगवून, माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलने केले -आयुक्त डॉ. पंकज जावळे
राज्यव्यापी संपावर उद्या सरकारी कर्मचार्‍यांची बैठक

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील प्रसिद्ध श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे संस्थापक कै. गोकुळचंदजी ठोळे यांचा 148 वा जयंती सोहळा  अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. योगेश कोठारी, सी. ए. श्‍वेता योगेश कोठारी, स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे सहसचिव सचिन अजमेरे, समिती सदस्य आनंद ठोळे, डॉ. अमोल अजमेरे, संदीप अजमेरे, राजेश ठोळे, माजी मुख्याध्यापक मकरंद कोर्‍हाळकर, दिलीप तुपसैंदर, प्रकाश दगडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीना पाटणी, भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम चे प्राचार्य मकरंद निमोणकर आदी सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
या प्रसंगी गोकुळचंदजी यांच्या कार्याचा परिचय दिगंबर देसाई यांनी करून दिला तर मुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी प्रास्ताविक करत विद्यालयाची परंपरा व विद्यालयाचे यश हे माजी विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या गगन भरारी वरच अवलंबून असल्याचे सांगितले. तर  समृद्धी त्रिभुवन या विद्यार्थिनींनी गायलेल्या गीताने सर्वांना प्रभावित केले.तर एस.एस.सी.मार्चच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी डॉ. योगेश कोठारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, कमी गुण मिळाले म्हणून खचून न जाता जिद्दीने चिकाटीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न मात्र आवश्यक असल्याचे सांगत यशस्वी होण्याचा सल्ला दिला. तर कैलास ठोळे यांनी आमची मराठी माध्यमाची मुले सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत. विद्यालयाची परंपरा नवीन काहीतरी करण्याची आहे.आम्ही विद्यार्थ्यांवर संस्कार करतो आणि नवीन धोरण राबवतो. दिलीप अजमेरे यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे या क्रांती बरोबरच मुला-मुलींनी सामाजिक जाणिवेचे भान ठेवून आपली प्रगती साधून घ्यावी असे स्पष्ट  केले.तर श्‍वेता योगेश कोठारी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांचे आभार उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांनी तर सूत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले.

COMMENTS