Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी संस्थानची 1 कोटी 74 लाखांची बचत ः गाडीलकर

सुपा येथे संस्थानने उभारलेल्या पवनचक्की प्रकल्पामुळे फायदा

शिर्डी ः श्री साईबाबा संस्थानने सुपा येथे कार्यान्वीत केलेल्या पवनचक्कीतून तयार झालेली पवन ऊर्जा कॅप्टिव्ह कन्झमशनद्वारे जानेवारी 2024 पासून संस्

कातळापूरमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप
अकोल्यातील बिरोबाचा यात्रोत्सव उत्साहात
आदिनाथ ढाकणे यांची नदी प्रहरी म्हणून निवड

शिर्डी ः श्री साईबाबा संस्थानने सुपा येथे कार्यान्वीत केलेल्या पवनचक्कीतून तयार झालेली पवन ऊर्जा कॅप्टिव्ह कन्झमशनद्वारे जानेवारी 2024 पासून संस्थानचे नवीन दर्शन रांग व मंदिर परिसरात वापरात आणली असून माहे जुलै-2024 अखेर सात महिन्यात 1 कोटी 74 लाख 19 हजार 659  रुपयांची बचत झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.  
श्री साईबाबा संस्थानच्या तत्कालीन व्यवस्थापन समितीचे मान्यतेने सन 2007 मध्ये सुपा येथे पवनचक्की प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पातून तयार होणारी उर्जा महाराष्ट्र राज्य वीज मंडळास रु.2.52/-पर यूनिट दराने देणेत येत होती. तीच ऊर्जा आता संस्थानचे नवीन दर्शन रांग व  मंदिर परिसरात माहे जानेवारी 2024 ते जुलै 2024 अखेर वापरत आणल्याने विजेचा वापर 22 लाख 41 हजार 426 युनिटस झाला, त्यापैकी अंदाजे 15.6 लाख युनिटस  साईबाबा संस्थानचे स्वत:च्या पवनचक्कीतून तयार झालेल्या पवन ऊर्जा कॅप्टिव्ह कन्झमशन द्वारे वापरात घेतली. याचा प्रती यूनिट अंदाजे रु.10/-संस्थानला आर्थिक फायदा झाला आहे. हा वापर जानेवारी 2024 पासून सुरु झाला आहे. हरित उर्जा निर्मीती क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर करणारे देशातील साईबाबा संस्थान,शिर्डी हे मोठे तीर्थक्षेत्र असेल. ही पवन ऊर्जा संस्थानचे नवीन दर्शन रांग व  मंदिर परिसरात कॅप्टिव्ह कन्झमशन द्वारे वापरात आणण्यासाठी श्री साईबाबा संस्थान  मा.तदर्थ  समिती(-व-हेल),अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा अहमदनगर, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी  गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता किशोर साहेबराव गवळी यांनी विशेष पाठपुरावा केला तसेच पवन ऊर्जेचा कॅप्टिव्ह कन्झमशन द्वारे वीज वापरात आणण्याचा प्रकल्प खसपळीशपीश एलेशपशीसू उेारिपू(र्झीपश) चे तात्रिक सल्लागार अरोह कुलकर्णी पुणे,  पूनम ज्ञानदेव चौधरी, रा. पोहेगाव  यांचे मार्गदर्शनाने ओयासीस ईनर्जी सोल्यूशन,मुंबई यांचेकडून पूर्ण करून या योजनेला मूर्त रूप आणले. संस्थानचा सध्याचा एकूण वीजेचा वापर विचारात घेऊन पूर्ण क्षमतेने वीज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रुप टॉप सोलर सिस्टीम व पवनचक्की उर्जा प्रकल्पात अधिकतम वाढ करण्याचा संस्थानचा मानस असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

COMMENTS