Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढोकरीकर परिवाराच्या सामाजिक बांधिलकीतून कर्जतमध्ये अग्निशमन केंद्र : खा. सुप्रियाताई सुळे

कर्जत ः कर्जत नगरपंचायतीच्या स्व. जीवनराव ढोकरीकर अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात झाले. या केंद्रा

संगमनेरात पोलिस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर
शिर्डीत मुलांनी तिरंग्यासह साकारला 75
पारनेरला वराळ पतसंस्थेच्या ठेवीदारांचे उपोषण

कर्जत ः कर्जत नगरपंचायतीच्या स्व. जीवनराव ढोकरीकर अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात झाले. या केंद्रासाठी नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांनी 16 गुंठे जागा नगरपंचायतीला दिली. एक कोटी रुपये खर्चुन हे केंद्र जनतेसाठी सुरू करण्यात आले आहे.
यावेळी आ. रोहित पवार, नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, प्रवीण ढोकरीकर, आशालाता ढोकरीकर, स्नेहा ढोकरीकर, शितल ढोकरीकर, सोनाली ढोकरीकर, मनाली ढोकरीकर, विक्रांत ढोकरीकर, केदार ढोकरीकर यांच्यासह मुख्याधिकारी श्री जायभाय उपस्थित होते. यावेळी खा. सुळे म्हणाल्या, ढोकरीकर परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत प्रकल्पासाठी 16 गुंठे जागा नगरपंचायतीला दिली. ही मदत निश्‍चितच कौतुकास्पद आहे. आ. रोहित पवार म्हणाले, अग्निशमन केंद्र ही कर्जतकरांची गरज होती. दुर्दैवाने घटना घडली तर यासाठी मदत केंद्र असावे, म्हणून एक इमारत आणि कर्मचार्‍यांना निवासस्थानासाठी ढोकरीकर कुटुंबीयांनी नगरपंचायतीला 16 गुंठे जागा दिली. त्यामुळे हा प्रकल्प उभा राहू शकला. नगरसेवक प्रसाद ढोकरीकर म्हणाले, आ. पवार यांच्या इच्छेनुसार या केंद्रासाठी आम्ही 16 गुंठे जागा तत्कालीन मुख्याधिकारी, नगरपंचायत, कर्जत यांना बक्षीस पत्र करून दिले. त्यामुळे अद्ययावत अग्निशमन केंद्र तयार झाले. विक्रांत ढोकरीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS