अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाचे खासगीकरण थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाचे खासगीकरण थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन

पुणे : नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाच्या 25 एकर क्षेत्रफळापैकी 10 एकर जागेवर क्लब आणि क्रिकेट स्टेडियम ''पीपीपी'' तत्वावर विकसित करण्या

चक्क आई-वडिलांनीच केला दोन अल्पवयीन मुलींचा त्याग
Solapur : क्रेनखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू (Video)
नवदाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या

पुणे : नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाच्या 25 एकर क्षेत्रफळापैकी 10 एकर जागेवर क्लब आणि क्रिकेट स्टेडियम ”पीपीपी” तत्वावर विकसित करण्याचे धोरण चुकीचे आहे. परिसरातील झोडपडपट्यांमध्ये राहणारी मुले पैसे भरुन मैदानाचा वापर करु शकणार नाहीत. मैदानी खेळाअभावी शारीरिकदृष्ट्या विकलांगतेकडे जातील. त्यासाठी संकुलाच्या 10 एकर जागेत नियोजित असलेले ”पीपीपी” तत्वावरील विकसित करण्याचे क्रिकेड स्टेडियमचे धोरण तत्काळ रद्द करावे, अशी मागणी अण्णासाहेब मगर स्टेडियम बचाव कृती समितीने केली आहे. अन्यथा मैदान खासगीकरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.याबाबत अण्णासाहेब मगर स्टेडियम बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर उषा ढोरे यांची भेट घेतली. पीपीपी” तत्वावरील विकसित करण्याचे नियोजित असलेले क्रिकेड स्टेडियमचे धोरण तत्काळ रद्द करण्याची विनंती केली. आयुक्त राजेश पाटील, स्थानिक नगरसेवक समीर मासुळकर यांनाही याबाबत निवेदन दिले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, मगर स्टेडियम हे कुठल्याही विशिष्ट खेळासाठी विकसित न करता ते पूर्वीसारखे मोकळे मैदान म्हणून सर्व प्रकारच्या खेळासाठी पालिकेच्या वतीने पुर्नविकसीत व व्यवस्थापित करावे. शहरातील कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यामुळे मैदानावरील जम्बो कोविड केअर सेंटर तत्काळ हलविण्यात यावे. मैदान स्थानिकांना वापरास खुले करावे.

COMMENTS