Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशक्ती आघाडी धरणग्रस्तांच्या पाठीशी ः माळवदे

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यात जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित होवून स्थायिक झालेली जवळ जवळ वीस ते पंचवीस गावे असुन आजही या गावांना पुनर्वसन विभागाने

वंचित शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्यांसाठी लढा देणार ः प्रा. चव्हाण
काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी
Ahmednagar : अवास्तव करवाढी विरोधात विविध संघटनांचे धरणे आंदोलन I LOK News 24

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यात जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित होवून स्थायिक झालेली जवळ जवळ वीस ते पंचवीस गावे असुन आजही या गावांना पुनर्वसन विभागाने न्याय दिलेला नाही. जायकवाडी धरण होवून आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत परंतू आजही या धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्त बांधवांना त्यांचा हक्काचा मोबदला न मिळाल्याने अन्याय सहन करावा लागत आहे तर आपल्या हक्कासाठी शासकीय कार्यालयांच्या दारी,लोकप्रतींनीधीच्या दारी, मंत्रालयात चकरा मारण्याची वेळ आली आहे.तालुक्यात परिवर्तन होवून धरणग्रस्त आमदार निवडून आला पण त्याने देखील या बांधवांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे धरणग्रस्तांच्या आशा धूसर झाल्या आहेत.
धरणग्रस्तांच्या ग्रामपंचायतींना अजूनही महसूल गावाचा दर्जा प्राप्त झालेला नसल्याने त्यांना वित्त आयोगाच्या निधीचा वापर करता येतं नाही.यांच्या जमिनी वर्ग एक करण्याचा जीआर असताना आजही त्या वर्ग दोनच आहे. चाळीस वर्षे झाले तरी अजूनही मिळालेल्या जमिनीचा मूळ मालकाकडून ताबा मिळाला नाही, तर काहींना अजुनही जमीन वाटप करणे बाकी आहे. तर जमीन वाटपाचा पूर्वीचा जिल्हाधिकारी कार्यालयचा अधिकार हा मंत्रालयात हस्तांतर केल्याने अजूनच अडचण वाढली आहे.प्रकल्पग्रस्तांना नोकरीसाठी प्रमाणपत्रे दिली परंतु याद्वारे नोकर्‍या मिळणं धूसर झाले आहे. धरणग्रस्तांना स्वतंत्र महामंडळाची सध्या गरज आहे पण मंत्रालयात यावर कोणी चर्चा करायला तयार नाही. नेवासा तालुक्यातील अनेक पुनर्वसित गावे पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. तसेच अनेक बांधवांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही, यासाठी अनेकदा आंदोलने करायची वेळ यांच्यावर आली आहे. लोकशक्ती आघाडीकडून आज धरणग्रस्त गावांना भेट देवून धरणग्रस्त बांधवांशी चर्चा केली. यावेळी लोकशक्ती आघाडी ही पूर्ण ताकदीने तालुक्यातील धरणग्रस्त बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील तसेच धरणग्रस्तांच्या मागण्यासाठी आक्रमक भूमिका घेत मैदानात उतरू असे स्पष्ट आश्‍वासन संभाजी माळवदे यांनी दिले. तर यावेळी सादिक शिलेदार, संतोष काळे, अंजुम पटेल, गणपत मोरे, विकास चव्हाण, आदींनी देखील धरणग्रस्त बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे स्पष्ट केले.

तालुक्यातील धरणग्रस्त बांधवांची आजी माजी लोकप्रतिनिधीनी घोर फसवणूक केली आहे. विकासाच्या बाबतीत धरणग्रस्त गावांना नेहमीच सावत्र असल्याची वागणूक दिली आहे.माजी आमदार हे स्वतः धरणग्रस्त असूनही  त्यानी धरणग्रस्तांची उपेक्षा केली प्रश्‍न सोडविण्याचे दूरच फक्तं निवडणुकी पुरतेच धरणग्रस्त असल्याचे सोंग करुन मतदान पदरात पाडून घेतले. लोकशक्ती आघाडीच्या माध्यमातून धरणग्रस्त बांधवाचे प्रश्‍न जाणुन घेवून ते सोडविणारच त्यासाठीं धरणग्रस्तांच्या मागण्यासाठी लढा उभारणार. सुरेश शेटे, प्रदेशाध्यक्ष, शिवसंग्राम

COMMENTS