Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शुक्राचार्य मंदिरात शिव महापुराण व शुक्र नीती कथेचे आयोजन

कोपरगाव शहर ः जगप्रसिध्द जिथे कोणतेही शुभकार्य करण्यास मुहूर्त लागत असे एकमेव कोपरगाव शहरातून वाहणार्‍या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी वसलेल्या परम स

शुक्राचार्य मंदिर सेवकांचा कामगार दिनी सन्मान
शुक्राचार्य मंदिराला भक्तांकडून नंदादीप भेट
शुक्राचार्य मंदिर सेवकांचा कामगार दिनी सन्मान

कोपरगाव शहर ः जगप्रसिध्द जिथे कोणतेही शुभकार्य करण्यास मुहूर्त लागत असे एकमेव कोपरगाव शहरातून वाहणार्‍या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी वसलेल्या परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिरात श्रावण महिन्याच्या पर्वकाळात  सोमवार दि 26 ऑगस्ट ते शुक्रवार दि 30 ऑगस्ट 2024 या पर्वकाळात दररोज संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत अहमदाबाद येथील प्रसिद्ध कथाकार भागवताचार्य  निलय भाईजी यांच्या सुमधुर वाणीतून  शिव महापुराण व शुक्र निती  या विषयावर कथा पुराण आयोजित केले आहे. या कथेस परिसरातील  सर्व शिव भक्तांनी व शुक्राचार्य भक्तांनी उपस्थित रहात या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज ट्रस्ट समिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव संजीव कुलकर्णी,खजिनदार गजानन कोराळकर, सदस्य सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे सदस्य संजय वडांगळे, आदिनाथ ढाकणे, अरुण जोशी, विशाल राऊत, बाळासाहेब लकारे, सुजित वरखेडे, विलास आव्हाड, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, मुन्ना आव्हाड, बाळासाहेब गाडे, विजय रोहम, दिलीप सांगळे, विकास शर्मा, भागचंद रुईकर, मधुकर साखरे व्यवस्थापक राजाराम पावरा आदीनी केले आहे.

COMMENTS